प्रेस मीडिया लाईव्ह :
शहरातील अनेक टेनिस ग्राउंड हे पुण्यातील एकाच नंदनबाल या ठेकेदाराला दिले आहेत. त्यामुळे शहरातील खेळाडू आणि शिक्षक यांना सरावाठी ते उपलब्ध होत नसल्याने त्या ठेकेदार याला दिलेले ग्राउंड काढून घेण्यात यावे अथवा काही ठराविक वेळेत त्यांनी त्याचा वापर करावा असा आदेश देण्यात यावा. पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने शहरातील खेळाडू यांना सरावासाठी अथवा खेळण्यासाठी ६ ग्राउंड तयार करण्यात आले आहे. त्यातील काही ग्राउंड ठेकेदार यांना देण्यात आले. त्यामुळे जे ग्राउंड ठेकेदार यांच्या कडून चालवण्यात येतात त्याठिकाणी इतर खेळाडू अथवा क्रीडा शिक्षक यांना त्याचा वापर करता येत नाही. मोहन नगर येथील टेनिस ग्राउंड हे ५ वर्ष त्या ठेकेदार नंदनबाल याला देण्यात आले. पण प्रत्यक्षात तेथे कोणीच खेळाडू शिकण्यासाठी येत नाही कारण तेथे प्रशिक्षित क्रीडा शिक्षक उपलब्ध नाहीत त्यामुळे परिसरातील नागरिक आपल्या मुलांना तेथे पाठवत नाही. असे निदर्शनास आले आहे. तसेच संभाजी नगर , गणेश तलाव तसेच चिखली येथील अनेक टेनिस ग्राउंड कोणत्याही वापराविना तसेच पडून आहे.
तरी परिसरातील नागरिक तसेच खेळाडू क्रीडा शिक्षक यांची सदर निवेदनाच्या माध्यमातून आपणांस विनंती आहे की , शहरातील खेळाडू यांना सरावासाठी तसेच नवीन खेळाडू घडविण्यासाठी आपल्याच शहरातील करदात्या नागरिकांच्या पैशातून उभे केलेले हे टेनिस ग्राउंड शहरातील खेळाडू , क्रीडा शिक्षक तसेच नागरिक यांना उपलब्ध करून देण्यात यावे. याकरिता सर्व टेनिस ग्राउंड हे पूर्वीसारखे ऑनलाईन नोंदणी पद्धतीने चालू करावे अशी मागणी करण्यात आली आहे.
कळावे
आपला नम्र
कु.राहूल कोल्हटकर
सामाजिक कार्यकर्ते
Tags
पिंपरी पुणे