प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी सुनील पाटील
उरण मधील यशश्री शिंदे हिच्या हत्येनंतर खळबळ उडाली होती. पोलिसांनी सूत्रं वेगाने फिरवत कर्नाटकमधून दाऊद शेख या आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आता या प्रकरणात अत्यंत महत्त्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे.यशश्रीच्या हत्येनंतर तिचा मोबाइल गहाळ झाला होता. अखेर मोबाईल पोलिसांच्या हाती लागला असून आता या प्रकरणात आणखी महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे.
यशश्री शिंदे हिच्या हत्येनंतर आरोपी दाऊद शेख याला पोलिसांनी कर्नाटक (गुलबर्गा) येथून अटक केली. आरोपी दाऊद शेखवर पोलिसांकडून अॅट्रॉसिटी अॅक्टनुसारही गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, त्याला 13 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षांपासून आमच्या दोघांमध्ये मोबाईलवरुन संपर्क होता, अशी कबुली अटकेनंतर दाऊद शेख याने दिली आहे.
यशश्रीचा मोबाईल गहाळ झाला होता. त्यामुळे पोलिसांकडे दाऊद याने कबुली दिल्यानंतरही पुरावा नव्हता. आता यशश्रीचा मोबाईल सापडल्यामुळे पोलिसांना या प्रकरणाचा तपास करणं आता आणखी सोपे होणार आहे. गहाळ झालेला मोबाईल सापडल्यामुळे या प्रकरणी आता आणखी खळबळजनक खुलासे होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पोलिसांनी डाटा मिळवण्यासाठी लॅबकडे पाठवला आहे.
दरम्यान, यशश्री शिंदे (वय 22, रा. उरण) या युवतीची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. एकतर्फी प्रेमातून यशश्रीच्या मारेकऱ्यानं निर्दयीपणे
ज्या कोयत्याने तिच्यावर वार केले होते तो रेल्वे ट्रॅक वरती फेकून दिला असता पोलिस शोध घेण्यात यशस्वी झाले अखेर कोयता पण तो पोलिसांच्या ताब्यात मिळाला.
वार केले, तिच्या शरीराची अक्षरशः विटंबना केली. तिच्या गुप्तांगावर आणि पोटावर अनेक वार करुन यशश्रीचा मृतदेह छिन्नविछिन्न करण्यात आला होता. त्यानंतर उरणमधील सगीर ब्रदर्स पेट्रोल पंपामागील मैदानावरील झुडुपांमध्ये तिचा मृतदेह फेकून देण्यात आला होता. आरोपी दाऊद शेख याच्या कर्नाटकातून पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.