प्रेस मीडिया लाईव्ह :
दिनांक 12/08/2024 रोजी ब्लू रेडिसन होटल नागपुर येथे दैनिक भास्करच्या वतीने ऑनलाइन वोटिंग द्वारे बेस्ट सोशल वर्कर ह्यूमन अवार्ड पुरस्काराचे आयोजन केले होते त्या मध्ये अनेक महिला प्रतियोगी होत्या आयोजकांनी हा पुरस्कार ऑनलाइन वोटिंग वर आधारित केले होते .
सुमय्या अली यांच्या मोठया प्रमाणावर सर्व जातीय धर्मांच्या लोकांचे समस्यांचे निवारण करीता केलेले सामाजिक कार्याची दखल घेऊन देशभरातून सर्व जातीय धर्मांच्या लोकांनी भरभरूण सुमय्या अली यांना ऑनलाइन वोटिंग केली जेने करूण सुमय्या अली बेस्ट सोशल वर्कर ह्यूमन अवार्डच्या मानकरी ठरल्या हा पुरस्कार प्रमुख अतिथि नागपुरचे पुलिस कमिश्नर रविंद्र जी सिंगल, IAS नागपुर मिताली सेठी, IAS नागपुर सौम्या शर्मा यांच्या उपस्थित ज्यूरी यांच्या हस्ते प्रदान करणयात आला त्याच सोबत रेलवे टूर पैकेज तसेच VICCO तर्फे गिफ्ट हैंपर सुद्धा प्रदान करणयात आले हा पुरस्कार सोहळा कार्यक्रमात महिला व पुरुष सैकढोच्या संख्याने उपस्थित होते .
हा पुरस्कार मिळाल्या नंतर सुमय्या अली यांनी ऑनलाइन वोटिंग करणारे देशभरातिल सर्वजनतेचे अभार मानले आहे सुमय्या अली यांनी अकोला जिलाच्या नावाचा डंका संपूर्ण देशभारत गाजवल्याने सर्वत्र त्यांचा अभिनंदन होत आहे