सौ. महाबुब उस्मान मुजावर यांच्या समाज कार्याची पोहच पावती पुरस्काराच्या रूपाने मिळाली


प्रेस मीडिया लाईव्ह 

शिरढोण येथे काही वर्षांपुर्वी अवकाळी मुसळधार पावसामुळे शिरढोण परिसरातील अनेक ऊसतोड मजूरांचा संसार अक्षरशः पाण्यात बुडाला होता.त्यामुळे पावसात भिजत, थंडीत कुडकुडत ऊसतोड मजूरांनी आपल्या लहान मुलाबाळांसह रात्र जागुन काढली.

यावेळी केवळ हळहळ व्यक्त न करता शिरढोण येथील सर्वसामान्य कुटुंबातील महाबुब मुजावर यांच्या कुटुंबीयांसमवेत ऊसतोड मजुरांच्या कुटुंबियांना एक घास संवेदनेचा या प्रमाणे गावातील सर्वच ऊसतोड मजुरांना एक वेळेस जेवण देऊन त्यांचे पावसात भिजलेली साहित्य स्थलांतरित करण्यास मदत सामाजिक बांधिलकी जपली. २०१९ कोरोना सारख्या काळात देखील अनेकांना मदत केली आहेत.२०२१ मध्ये महापुराच्या पाण्यामुळे अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली या वेळी देखील एक पाऊल पुढे टाकत आपले कार्य चालू ठेवले होते.यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.त्यामुळे मुजावर कुटुंबांचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.


पुणे येथील आघाडीची वृत्तसंस्था पुणे न्यूज एक्सप्रेस तर्फे  सौ. महाबुब उस्मान मुजावर  यांची राज्यस्तरीय पुरस्कार 2024 साठी  निवड करण्यात आली आहे


हैदर अली मुजावर : शिरढोण 

Post a Comment

Previous Post Next Post