व्यापाऱ्यांनी पत्रकारांशी चांगले संबंध ठेवावेत, शिरोळ व्यापारी असोसिएशनची भूमिका : रविंद्र वस्त्रनिकेतनचा वाद मिटला

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

 शिरोळ :पत्रकार हे समाजाचा आरसा आहेत त्यांच्याशी सर्वच व्यापाऱ्यांनी सलोख्याचे संबंध ठेवून वाटचाल केली पाहिजे, किरकोळ गोष्टींतून वाद होणार नाहीत याची काळजी घ्या, पत्रकारांनीही व्यापाऱ्यांना सहकार्य करून त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी विनंती करत शिरोळ शहर व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी काल रविंद्र वस्रनिकेतन व दैनिक अप्रतिम यांच्यामध्ये निर्माण झालेला वाद मिटवून भविष्यात चांगले संबंध ठेवण्याचा सल्ला दिला. शिरोळ व्यापारी असोसिएशनच्या कार्यालयात ही बैठक झाली, बैठकीमध्ये वाद कशावरून झाला यावर बोलत न बसता नुकसान होऊ नये याची काळजी घेऊन पुढे चला असे म्हणत पत्रकारांना सहकार्य करा व व्यापाऱ्यांनीही सलोखा निर्माण करून आपली बाजू पत्रकारांसमोर योग्यरित्या मांडल्यास वाद होत नाहीत काही कारणाने

काही घडले असले तरी वाद बाजूला ठेवून एकत्र या असे आवाहन शिरोळ व्यापारी असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केल्यानंतर या वादावर काल पडदा पडला आहे.

यावेळी शिरोळ व्यापारी असोसिएशन चे महेश मोरे, युवा नेते रूपेश मोरे, विकी केसरकर, कृष्णात पाटील यांच्यासह दैनिक अप्रतिम चे संपादक रविराज ऐवळे तर रविंद्र वस्रनिकेतन कडून डॉक्टर आप्पासो पाटील व राजेंद्र आंबी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post