प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
मांडवा ते मुंबई (गेट वे ऑफ इंडिया) दरम्यान समुद्रातील फेरी बोटीतून होणारी प्रवासी जलवाहतूक १ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. मान्सूनमध्ये खवळणाऱ्या समुद्रामुळे ही वाहतूक २६ मे पासून बंद ठेवण्यात आली होती. गौरी-गणपती निमित्ताने अलिबाग, मुरुड येथे येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होणार आहे.
पावसाळयाच्या दिवसात ही सेवा बंद ठेवण्यात येत असते. पावसाळा संपत आल्यानंतर हवामान आणि समुद्राच्या लाटांचा अंदाज घेवून मेरीटाइम बोर्ड ही सेवा सुरू करण्याबाबत निर्णय घेत असते. हा मार्ग खुला होत असल्याने मुंबईतील पर्यटकांचा ओघ अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन स्थळांकडे वाढणार आहे. आठ महिने मांडवा ते गेटवे, गेटवे ते अलिबाग मांडवा असा प्रवास बोटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या मेरीटाईम बोर्डाच्या माहितीनुसार पंधरा लाखांच्या आसपास आहे. या जलमार्गावरून पीएनपी, मालदार, अजंठा, अपोलो या कंपन्यांच्या प्रवासी बोटी सुरू असतात
७ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. हा मार्ग खुला होत असल्याने गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा मिळणार आहे. मुंबईतील पर्यटकांचा ओघ अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन स्थळांकडे वाढणार आहे. आठ महिने मांडवा ते गेटवे, गेटवे ते अलिबाग मांडवा असा प्रवास बोटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या मेरीटाईम बोर्डाच्या माहितीनुसार पंधरा लाखांच्या आसपास आहे.
1 सप्टेंबर पासून मांडवा ते गेटवे ऑफ मुंबई हा मार्ग मध्यम आकाराच्या फेरीबोटींसाठी खुला होणार आहे. खराब हवामानाचा जोपर्यंत अडथळा निर्माण होत नाही तोपर्यंत या मार्गावर दिवसा जलवाहतूक सुरु राहिल. तशा सुचना सबंधीत वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी फेरीबोट सुरु करण्यापूर्वी त्यांची डागडुजी, सुरक्षा साधनांची तपासणी करुन घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत अशी माहिती प्रादेशिक बंदर अधिकारी डॉ. सी. जे. लेपांडे यांनी दिली.