पनवेल मध्ये महाविकास आघाडीची एल्गार परिषद संपन्न. लढेंगे और जितेंगे )

 


प्रेस मीडिया लाईव्ह 

विशेष प्रतिनिधी :  सुनील पाटील

   आपल्या मानगुटीवर कोणी हात घालत असेल तर त्याचा हात वरच्यावर काढून टाकू. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दि.बा. पाटील यांचं नाव देण्यासाठी आम्ही आग्रही होतो. गेल्या आठवड्यात दिल्ली येथे आयोजित केलेला बैठकीसाठी जे एम म्हात्रे  जाणार होते परंतु रात्री त्यांना फोन करून बैठक रद्द झाल्याचे सांगण्यात आले, मात्र 

दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांमध्ये विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांना निवेदन देताना पनवेल आणि उरण चे विद्यमान आमदार यांचे फोटो झळकले यावरून त्यांना विमानतळ नामांतरापेक्षा आपला पक्ष महत्त्वाचा वाटला. असे वक्तव्य दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पनवेल येथे आयोजित एल्गार परिषदेत केले. ते पुढे म्हणाले नैनाला आमचा पहिल्यापासूनच विरोध आहे  असे असताना नैनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी  फडके नाट्यगृहात मेळावा आयोजित केला होता. याचाच अर्थ त्यांना नागरिकांपेक्षा आपला व्यवसाय मोठा वाटतो हे सिद्ध होते. ही एल्गार परिषद तातडीने घेतली कारण पनवेल महानगरपालिकेचा दुहेरी प्रॉपर्टी टॅक्स बाबत नागरिकांच्या मध्ये जनजागृती करण्यासाठी घेतली आहे.

             यावेळी व्यासपीठावर माजी आमदार बाळाराम पाटील, पनवेल उरण महाविकास आघाडीचे अध्यक्ष बबन दादा पाटील, काँग्रेस पक्षाचेआर सी घरत, माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, पनवेल विधानसभा अध्यक्ष काशिनाथ पाटील,काँग्रेसचे पनवेल जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण शेठ घरत, पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा भावनाताई  घाणेकर, सुधाकर पाटील, सुरेश ठाकूर,मल्लिनाथ गायकवाड,आदी  मान्यवर उपस्थित होते.

         यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना उरण पनवेल महाविकास आघाडीचे अध्यक्ष बबन दादा पाटील यांनी सांगितले आजच्या परिषदेमध्ये जे विचारले त्यांचे  संकलन एकत्र केले जाईल आणि येत्या 22 तारखेला पुन्हा एकत्र येऊन आपल्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल. आपल्या भाषणात सुरेश ठाकूर यांनी सांगितले महाराष्ट्र राज्याचे नगर विकास खाते हे नागरिक भकास खाते झाले आहे, आपण ताकद लावली तर 23  गावातून नयना प्रकल्प हटवता येईल मात्र यासाठी आपला आमदार विधानसभेत पाहिजे. यावेळी  भावना ताई घाणेकर यांनी सांगितले पनवेल आणि उरण च्या आमदारांना जर खरोखरच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवा पाटलांचे नाव द्यायचे असते तर छुपा अजंठा राबवला नसता. जेव्हा भारताचे पंतप्रधान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय  एअरपोर्टला आले होते तेव्हा त्याने दि.बा. पाटील साहेबांचा साधा उल्लेख हि केला नाही .

                 (  चौकट) 

  प्रीतम म्हात्रे ( माजी विरोधी पक्षनेता पनवेल महानगरपालिका )

   उरण पनवेल मधील नागरिकांना दि बा पाटील यांच्यामुळेच साडेबारा टक्के चा भूखंड मिळाला, तसेच आपण जनजागृतीसाठी एक पत्र काढूया आणि त्यामध्ये आपण केलेली कामे त्यामध्ये नमूद करूया आणि ते नागरिकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी घेऊया, तसेच येणाऱ्या विमानतळा मध्ये स्थानिक मुला मुलींना काम मिळावे यासाठी आमच्या जे एम म्हात्रे  संस्थेच्या मार्फत मुलांना मोफत मार्गदर्शक शिबिर आयोजित करीत आहोत.

Post a Comment

Previous Post Next Post