घरोघरी तिरंगा” उपक्रमांतर्गत विविध शाळा व क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत उपक्रम संपन्न

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

महाराष्ट्र राज्यामध्ये घरोघरी तिरंगा २०२४ मोहीम राबविण्यात येत असून दिनांक ९ ते १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत विविध आयोजित करणेबाबत संचालनालयाने दिनांक ८/८/२०२४ च्या पत्रान्वये मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत "हर घर तिरंगा म्हणजे घरोघरी तिरंगा" या अभियाना अंतर्गत अहिल्यादेवी होळकर शाळा चव्हाण नगर येथील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, क्षेत्रीय कार्यालय  आरोग्य विभागाचे सर्व सेवक व अधिकारी यांनी घरोघरी तिरंगा याची प्रतिज्ञा घेतली व परिसरा मध्ये प्रभात फेरी घेऊन नागरिकांना या अभियानाबाबत जनजागृती करण्यात आली.






धनकवडी सहकार नगर क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या सरहद  स्कूल मध्ये घर घर तिरंगा हर घर तिरंगा शासनाच्या उपक्रमांतर्गत   तिरंगा प्रतिज्ञा घेण्यात आली. प्रभाग क्रमांक ४२, आंबेगाव येथील जिल्हा परिषद शाळा व सन ब्राईट स्कूल या शाळेमध्ये हर घर तिरंगा घर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत प्रतिज्ञा घेण्यात आली. थोरवे शाळा म.न.पा. चंद्रभागा चौक येथे तिरंगा प्रतिज्ञा घेण्यात आली.


घरोघरी तिरंगा अभियान अंतर्गत वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यकक्षेतील नामवंत व्यक्ती पैकी ज्येष्ठ अभिनेते श्री आनंद इंगळे यांचा त्यांचे निवास स्थानी तिरंगा देऊन सत्कार व वंदना करण्यात आले आहे. हर घर तिरंगा अभियान अंतर्गत वारजे कर्वेनगर वॉर्ड ऑफिसच्या कार्यकक्षेतील नामवंत व्यक्ती पैकी भारतीय क्रिकेट खेळाडू श्री. केदार जाधव यांचा त्यांचे निवास स्थानी तिरंगा देऊन सत्कार करण्यात आले आहे.

नगर रोड क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत लोहगाव येथील श्री संत तुकाराम प्राथमिक विद्यालय येथे "हर घर तिरंगा घरघर तिरंगा" या अभियानांतर्गत रॅली तसेच तिरंगा शपथ घेण्यात आली. संत गोरोबा बालविद्यानिकेतन विमान नगर येथे  प्रतिज्ञा  घेण्यात आली.


मनपा शाळा क्रमांक ८३ मुलांची माळवाडी हडपसर येथे घरोघरी तिरंगा उपक्रमांतर्गत  तिरंगा प्रतिज्ञा घेण्यात आली. आमदार सूर्यकांत लोणकर शाळा क्रमांक १०८ बी. सिद्धार्थ नगर कोंढवा येथे तिरंगा उपक्रमांतर्गत  तिरंगा प्रतिज्ञा घेण्यात आली.प्रभाग क्रमांक आठ इंदिरा गांधी शाळा हर घर तिरंगा ची शपथ घेण्यात आली.


हर घर तिरंगाघर घर तिरंगाअभियानांतर्गत आज मा. सुहासजी जाधवसाहेब सहाय्यक आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री महेंद्र सावंतसाहेब DSI यांच्या सूचनेनुसार १३/८/२०२४ रोजी तिरंगा रॅली आयोजित केली होती. सदर रॅली कसबा पेठतांबट हौदपवळे चौकशिंपी आळीव परिसरात करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना तिरंगा झेंड्याचे महत्व पटवून देण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी परिसरात देशप्रेमी घोषणा दिल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊ व पेन वाटप करून रॅलीची सांगता करण्यात आली. या रॅलीमध्ये राजमाता जिजामाता शाळेचे 150 विद्यार्थी ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच क्षेत्रीय कार्यालयाकडील आरोग्य निरीक्षक श्री कृष्णा अवघडेकनिष्ठ अभियंता श्री साबळे साहेबमोकदम अविनाश मोहितेमुकादम सुनील मोरे व सेवक उपस्थित होते.


हर घर तिरंगाघर घर तिरंगाअभियानांतर्गत आज मा. सुहास जाधव, सहाय्यक आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री महेंद्र सावंत, DSI यांच्या सूचनेनुसार तिरंगा रॅली आयोजित केली होती. सदर रॅली कसबा पेठतांबट हौदपवळे चौकशिंपी आळी व परिसरात करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना तिरंगा झेंड्याचे महत्व पटवून देण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी परिसरात देशप्रेमी घोषणा दिल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊ व पेन वाटप करून रॅलीची सांगता करण्यात आली. या रॅलीमध्ये राजमाता जिजामाता शाळेचे १५० विद्यार्थी ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच क्षेत्रीय कार्यालयाकडील आरोग्य निरीक्षक श्री कृष्णा अवघडेकनिष्ठ अभियंता श्री साबळेमोकदम अविनाश मोहितेमुकादम सुनील मोरे व सेवक उपस्थित होते.

धनकवडी सहकार नगर क्षेत्रीय कार्यालय तर्फे ब्रँड अँबेसिडर यांच्यासह १५ ऑगस्ट निमित्त भारतीय विद्यापीठ मागील गेट व्यापारी भागात डीपी क्लीन ड्राईव्ह घेण्यात आला. यावेळी घरोघरी तिरंगा या उपक्रमा निमित्त धनकवडी सहकार नगर क्षेत्रीय कार्यालय सुरेखा भणगे मॅडम, सहाय्यक आयुक्त यांच्या हस्ते घरोघरी लावण्यासाठी तिरंगा ध्वज देण्यात आला.

यशवंत राव चव्हाण नाट्यगृह येथेघरोघरी तिरंगा उपक्रमा अंतर्गत श्री. संकर्षण कऱ्हाडे -नाट्य अभिनेता यांनी तिरंगा शपथ घेतली.


प्रभाग क्रमांक २२ मुंढवा आरोग्य कोठी अंतर्गत राजश्री शाहू महाराज विद्यालय येथे घरोघरी तिरंगा अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांमार्फत प्रतिज्ञा घेण्यात आली . नानासाहेब पेशवे तलाव उद्यान कात्रज व स्वामी विवेकानंद उद्यान कोंढवा तसेच शिवरकर उद्यानवानवडी येथे नागरिकांकरिता सेल्फी पोईण्ट उभारण्यात आला आहे.



 


Post a Comment

Previous Post Next Post