प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : १९४२ ऑगस्ट क्रांती दिनाच्या स्मृतिदिनानिमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने काँग्रेस भवन येथे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंद यांच्या हस्ते झेंडावंदन करून शहिदांना अभिवादन करण्यात आले.
या वेळी बोलताना अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘भारतीय संग्रामात अगणित लोकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले त्यांना ही श्रध्दांजली अर्पण करतो. तसेच १९४२ च्या मुंबई येथील काँग्रेसच्या अधिवेशनात महात्मा गांधींनी ‘इंग्रज चले जाव’ चा नारा दिला आणि वातावरण बदलले. इंग्रजांनी काँग्रेसचे नेते महात्मा गांधी, मौलाना आझाद, पं. नेहरू व अन्य नेत्यांना पकडून नगर येथील किल्ल्यात बंदिस्त केले. या गोष्टीमुळे भारतभर आंदोलनाचे वातावरण निर्माण झाले. अनेक लोक तुरूंगात गेले. ‘चले जाव’ चा ठराव करताना राजेंद्र प्रसाद, वल्लभभाई पटेल, शामाप्रसाद मुखर्जी हे मसुद्याचे प्रमुख होते. १९४२ च्या लढ्याच्या संग्रामात तीव्र लढा उभारला गेल्या नंतर शामाप्रसाद मुखर्जी यांना व्हॉईस रॉय यांना पत्र लिहून भारतीय लोकांना स्वातंत्र देऊ नये असे कळविले होते. त्यांचा आज आर.एस.एस. प्रणित लोकांकडून बोलबाला केला जात आहे. आर.एस.एस. ने स्वातंत्र्य लढ्यात अजिबात भाग घेतला नाही. या लढ्याचा इतिहास भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात महत्वाचा व अलौकिक आहे. स्वातंत्र लढ्याचा संपूर्ण इतिहास काँग्रेसच्या नावाने आहे. काँग्रेसच्या लोकांनी सातत्याने लढा चालू ठेवला, तुरूंगवास भोगला पण ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी काही केले नाही ते आर.एस.एस. आज नव्या पिढीला खोटे नाटे सांगतात ही बाब दुर्दैवी आहे. स्वातंत्र्य लढ्यात राष्ट्रीयता, एकात्मता, समानता या गोष्टींचा ध्यास घेऊन लढा लढले परंतु वरील त्रिसूर्तीचा मागमूस नसलेल्या लोकांनी आम्हाला देशप्रेम शिकवावे ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. १९४२ च्या चले जाव च्या आंदोलनामध्ये मुंबई नंतर देशामधील महत्वाचे ठिकाण असलेले हे पुणे शहर जिथे हुतात्मा नारायण दाभाडे यांना इंग्रजांनी या काँग्रेस भवनच्या आवारामध्ये गोळ्या घातल्या. याच पुणे शहराने देशाला दिशा देणारे विचारवंत नेतृत्व देणारे कतृत्ववान नेते दिले. माझे आपणास एवढेच सांगणे आहे की देशाची अखंडता, समानता, बंधू - भाव या गोष्टी जपण्यासाठी प्राणपणाने लढा द्यावा लागला तरी काँग्रेस जणांनी त्यासाठी सज्ज राहिले पाहिजे. आजच्या या दिवशी देशभक्तांना हुतात्म्यांना माझा त्रिवार प्रणाम.’’
यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार उल्हास पवार, दिप्ती चवधरी, ॲड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, नगरसेवक रफिक शेख, अजित दरेकर, सुजाता शेट्टी, वैशाली मराठे, नितीन परतानी, सुमित डांगी, राज घेलोत, शाम काळे, प्रकाश पवार, अनुसया गायकवाड, उषा राजगुरू, रमेश सोनकांबळे, राजू ठोंबरे, संतोष पाटोळे, हर्षद हांडे, भगवान कडू, अनिल राठोड, अर्जुन लोणंदकर, रंजना रजपूत, वीणा कदम, सुनिता पेदुंरकर, महेंद्र तिडके, बाबा भोसले, योसेफ बलिद, गणेश कवडे, परेश गायकवाड, शंकर वाणी, राजू सकट, आदींसह असंख्य काँग्रेजन यावेळी उपस्थित होते.