प्रेस मीडिया लाईव्ह :
पुण्यातील यवत परिसरात अन्न तयार करणाऱ्या कारखान्यात अमोनिया वायूची गळती झाल्याने १७ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी रेडी टू इट फूड प्रोसेसिंग युनिटमध्ये ही घटना घडली, अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात दाखल असलेल्या एका महिलेला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी सांगितले की, गॅस गळतीच्या घटनेत 17 जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सर्वांची प्रकृती स्थिर असून धोक्याबाहेर आहे, मात्र खबरदारी म्हणून त्यांना डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. दरम्यान, कारखान्यातील गॅस गळतीचे कारण तपासण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने कारखान्याला भेट दिली. पोलिसांनी सांगितले की, कारखान्याच्या अंतर्गत सुरक्षा यंत्रणेने गॅस गळतीवर तात्काळ नियंत्रण मिळवले.