"सेवानिधी समर्पण हा सामाजिक कृतज्ञतेचा वस्तुपाठ"

 


  अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेला पाच लाख रुपयांचा निधी शुक्रवारी प्रदान करण्यात आला. एअर व्हाइस मार्शल (निवृत्त) नितीन वैद्य यांनी तो राजन गोऱ्हे यांच्या हस्ते स्वीकारला.

________________________________________________

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे   :  सामाजिक क्षेत्रात निरपेक्ष भावनेने काम करत असलेल्या संस्थांना निधी प्रदान करून त्यांना बळ देण्याचे काम करणे हा सामाजिक जाणिवेचा वस्तूपाठ आहे,असे मनोगत भारतीय संस्कृती संवर्धन संस्थेचे अध्यक्ष राजीव जोशी यांनी शुक्रवारी व्यक्त केले. साई आध्यात्मिक सेवा समितीतर्फे आयोजित सेवा निधी समर्पण कार्यक्रमात राजीव जोशी बोलत होते. समितीच्या ज्येष्ठ मार्गदर्शक वंदनीय लीलाताई भागवत यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त भागवत यांच्या इच्छेनुसार त्यांची स्वतःची संचित वीस लाख रुपयांची धनराशी सात सामाजिक संस्थांना देण्यात आली. 

संस्थांना निधी प्रदान करतानाची सामाजिक जाणीव मोलाची असल्याचे जोशी म्हणाले. सेवा समितीचे गिरीश वाघ, विजय गाडगीळ,अभिजीत खाडे यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेला पाच लाखांचा निधी देण्यात आला. एअर व्हाइस मार्शल (निवृत्त) नितीन वैद्य यांनी तो स्वीकारला. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या भावे प्राथमिक शाळेचा निधी मुख्याध्यापिका प्रतिभा गायकवाड आणि डॉ. मानसी भाटे यांनी,विद्या प्रतिष्ठानच्या सरस्वती विद्यामंदिर संस्थेचा निधी संध्या डंबिर आणि सुहास देव यांनी,ज्ञानदा प्रतिष्ठानचा निधी बापू गोहाड यांनी तर महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचा निधी अध्यक्ष रवी देव आणि सहाय्यक सचिव प्रदीप वाजे यांनी स्वीकारला. भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेचा निधी अध्यक्ष राजीव जोशी आणि प्रकाश आठवले यांनी तर सेवा भारती संस्थेचा निधी सचिव प्रदीप सबनीस यांनी स्वीकारला.

या सहा संस्थांना प्रत्येकी अडीच लाख रुपयांचा निधी देण्यात आला.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीचे प्रांत कार्यवाह राजन गोऱ्हे यांनी प्रास्ताविकात सामाजिक संस्थांची माहिती दिली. लीलाताई भागवत यांच्या कार्याची माहिती अभिजीत खाडे, विजय गाडगीळ,धनश्री साने आणि शैलजा गोऱ्हे यांनी दिली.


Post a Comment

Previous Post Next Post