दहा दिवसात जर उड्डाणपूलाचे काम सुरू झाले नाही तर भाजपा आमदार व नगरसेवकांच्या घराबाहेर तीव्र आंदोलन करणार. अरविंद शिंदे, अध्यक्ष-पु.श.काँ.क


प्रेस मीडिया लाईव्ह :

 

  पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघातील घोरपडी गाव रेल्वे स्टेशन जवळील पुलाचे उद्‌घाटन होऊनही अद्याप पर्यंत कामाचा पत्ता नाही त्यामुळे वाहतुक कोंडी वाढली आहे म्हणून राज्य सरकार व प्रशासनाच्या विरोधात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने घोरपडी जयहिंद चौक येथे आंदोलन करण्यात आले.

   

  

आंदोलन प्रसंगी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘८ महिन्यांपूर्वी घोरपडी गावातील रेल्वे स्टेशन जवळील पुलाच्या कामाचे उद्‌घाटन झाले पेढे वाटले परंतु कामाचा अजून पत्ता नाही. कोणत्याही परवानग्या नसताना जनतेची फसवणूक करून वाहतुकीचा बट्ट्याबोळ झाला आहे. स्थानिक भाजपा नेत्यांनी पुलाचे बांधकाम सुरू करण्याचे उद्‌घाटन सुरू केले परंतु अद्यापपर्यंत मात्र त्यांनी हे काम सुरू होऊ दिले नाही. वाहतुक कोंडीमुळे स्थानिक नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता त्यावेळी स्थानिक नेत्यांनी नागरिकांना आश्वासने दिली की निवडून आल्यावर पुलाचे काम शंभर टक्के करू परंतु त्यांचा कार्यकाळ संपत आला तरीही त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत व सदर ठिकाणी अजून कामाचा पत्ताच नाही. महिलांना शाळेत सुध्दा मुलांना वेळेवर सोडता येत नाही, नागरिकांना वेळेवर कामावर पोहचता येत नाही या सर्व अडचणी भारतीय जनता पक्षाचे स्थानिक आमदार व नगरसेवक यांच्यामुळे झाल्या आहेत. पुलाच्या कामाची वर्क ऑर्डर अजून दिली गेली नाही याचे कारण काय? भाजपा नेत्यांच्या जो पर्यंत डिमांड पूर्ण होणार नाही तो पर्यंत काम सुरू करण्यात येणार नाही अशी माहिती आम्हाला मिळाली. घोरपडीकरांना समजले पाहिजे की आपली दिशाभूल कोण व कशी करीत आहेत. आमदारांना मलिदा खायला मिळतोय म्हणून ३ वर्षे होऊन गेले तरीही महानगरपालिकेच्या निवडणुका घेतल्या जात नाही.

 

 २४ महिन्यात पूलाचे बांधकाम पूर्ण झाले पाहिजे असे असताना ८ महिने होऊन गेले तरी काम सुरू नाही. जर येत्या दहा दिवसात पुलाचे काम सुरू झाले नाही तर भाजपा आमदार व नगरसेवकांच्या घराबाहेर पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.’’


यानंतर माजी नगरसेवक अविनाश साळवे, प्रदेश महिला उपाध्यक्षा संगीताताई तिवारी, ओ.बी.सी.विभागाचे अध्यक्ष प्रदिप परदेशी व संजय कवडे यांचीही भाषणे झाली.  
या आंदोलन प्रसंगी माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, माजी नगरसेवक अविनाश साळवे, लताताई राजगुरू, अजित दरेकर, रफिक शेख, जॉन पॉल, प्रदेश महिला उपाध्यक्षा संगीताताई तिवारी, मुख्तार शेख, अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सुजित यादव, ओबसी विभागाचे अध्यक्ष प्रदीप परदेशी, संजय कवडे, प्रदेश प्रतिनिधी महेबुब नदाफ, संतोष आरडे, नितीन परतानी, विठ्ठल गायकवाड, सुनील घाडगे, सेवादलाचे प्रकाश पवार, रीबीका कांबळे, उषाताई राजगुरू, इम्रान शेख, ब्लॉक अध्यक्ष असिफ शेख, राजु ठोंबरे, रमेश सोनकांबळे, हेमंत राजभोज, रवी आरडे, वाहतूक विभागाचे अयाज खान, नुर शेख, बेबी राऊत, शोभना पण्णिकर, सुनिता नेमुर, देविदास लोणकर, फिरोज शेख, मतीन शेख, शिवसेनेचे नितीन निगडे, आपचे केविन सॅमसन, अभिजीत गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीनिवास लादे, अक्रम शेख इतर स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. 

Post a Comment

Previous Post Next Post