भारतीय मजदूर संघाचे ज्येष्ठ नेते डॉ सुधाकर कुलकर्णी यांचे निधन

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : डॉक्टर सुधाकर कुलकर्णी भारतीय मजदूर संघाचे ज्येष्ठ नेते, प्रचारक यांचे दि ६ ऑगस्ट २०२४ रोजी  सकाळी भोपाळ येथे दुःखद निधन झाले.मृत्युसमयी त्यांचे वय ८६ वर्षे होते. गेली पन्नास वर्षे भारतीय मजदूर संघाच्या कामांमध्ये त्यांनी आपले योगदान दिले. 

आयुर्वेदिक डॉक्टर असलेले डॉ. कुलकर्णी हे मूळचे नागपूरचे. त्यांचा मध्य प्रदेश मध्ये स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय होता. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी यांच्या आग्रहाने त्यांनी आपला वैद्यकीय व्यवसाय बंद करून भारतीय मजदुर संघाचे पूर्ण वेळ काम सुरू केले.आयुष्यभर अविवाहित राहून संघ प्रचारक म्हणून त्यांनी काम केले. 

महाराष्ट्र ,मध्य प्रदेश आदी ठिकाणी काम केल्यानंतर त्यांना आसाम आणि ईशान्य भारतातील सात राज्यांची जबाबदारी देण्यात आले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी मजदूर संघाचं काम त्या ठिकाणी सुरू केलं. कुठलाही सोयी सुविधा नाही, वाहतुकीचे साधन नाही, निवास जेवण कुठल्या व्यवस्था नाही अशा परिस्थितीमध्ये त्यांनी कामाला सुरुवात केली. सुमारे पंधरा वर्षे त्यांनी त्या भागात काम केले.त्यांच्या प्रयत्नातून चहा , काॅफी मळ्यातील असंघटित कामगार,अंगणवाडी,घरेलु कामगार, खदान कामगार आणि अन्य कामगार क्षेत्रात  मणिपूर,आसाम,मेघालय या ठिकाणी भरीव काम केले. त्यानंतर त्यांच्याकडे महाराष्ट्र, विदर्भ,गोवा अशी क्षेत्र प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. येथेही त्यांनी चांगले काम केले.भारतीय मजदुर संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून पण काम पाहिले.


शांत आणि प्रेमळ स्वभावाचे डॉक्टर सुधाकर कुलकर्णी संघाचे एकनिष्ठ समर्पित कार्यकर्ता होते. सर्वस्व वाहून देऊन भारतीय मजदूर संघाचे काम वाढवले. त्यात डॉक्टर  सुधाकर कुलकर्णी यांचे नाव देखील अग्रस्थानी राहील. गेल्या अनेक दिवस ते भोपाळ मध्ये होते,आजारी होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली.  आपला एक ज्येष्ठ सहकारी आपल्याला सोडून गेला अशी भावना महाराष्ट्र, पुर्वांचलातील हजारो कार्यकर्ते ची झाली आहे.  

भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने त्यांच्या पवित्रा आत्म्यास परमेश्वर सद्गती देवो हीच प्रार्थना 

भावपूर्ण श्रद्धांजली !  

सचिन मेंगाळे 

सरचिटणीस 

अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) 

9422037029 

sachinmbms@gmail.com

Post a Comment

Previous Post Next Post