प्रेस मीडिया लाईव्ह :
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील पिंपळे गुरव येथील पवना नदीच्या पूररेषेत स. नं. २५/१अ/१, ८५/१ब/२/१, ९१/१ब, ८६/२ब/१ या जागेवर अवैध पध्दतीने निवासी बांधकाम केले आहे. पर्यावरणीय नियमाचे उल्लंघन करत महापालिका बांधकाम विभागाने ८ अ, ८ ब, ८ क अशा तीन इमारती पुर रेषेत ( ब्लू लाईन) मध्ये उभ्या केलेल्या आहेत.
त्या गृहप्रकल्पाची संपुर्ण विक्री झालेली असून सुमारे ७० ते ८० फ्लॅट तयार करत एक फ्लॅट अंदाजे एक ते सव्वा कोटी रुपयास विक्री केला आहे. इमारतीचे बांधकाम पुर्ण केले असून त्या इमारतीत राहण्यास येणा-या नागरिकांच्या जिवितास धोका निर्माण केला आहे. महापालिका बांधकाम अधिकारी आणि पाटबंधारे अधिका-यांनी आर्थिक संगणमताने कागदपत्रात फेरफार करत नियमबाह्य इमारत बांधण्यास करण्यास मदत केलेली आहे.
पवना नदीची पुररेषा बदलून इतरत्र हस्तांतरित केल्याचा अहवाल कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, खडकवासला यांनी महापालिकेकडे दिला. त्यानंतर महापालिकेकडून कोणतीही खातरजमा न करता नदी पात्रात पुररेषेत कल्पतरु कन्स्ट्रक्शन यांना त्या जागेवर बांधकाम करण्याची परवानगी देण्यात आली.
दरम्यान, पिंपळे गुरव येथील पवना नदी पात्रात कल्पतरु कन्स्ट्रक्शन यांनी पुररेषेत अवैध बांधकाम केले असून त्यांना बांधकाम परवानगी देणा-या महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त, शहर अभियंता, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता या सर्व अधिका-यांनी नियमबाह्य कामे केल्याने त्यांची उच्चस्तरीय चौकशी होऊन संबंधिताना निलंबित करुन त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी.तसेच पाटंबधारे विभागाकडून पुररेषा बदलण्याचा दिलेला अहवाल तात्काळ रद्द करण्यात यावा. त्या अहवालानूसार कल्पतरु कन्स्ट्रक्शनने नदी पात्रात बांधलेल्या ८ अ, ८ ब, ८ क अशा तीन इमारती पुर रेषेत ( ब्लू लाईन) मध्ये उभ्या केलेल्या असून त्या जमीनदोस्त करण्यात याव्यात. असे आपचे नेते रविराज काळे यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन दिले.