लोकशाहीला बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी बळकट व मजबूत राहण्याची गरज आहे- प्रसाद कुलकर्णी

कोल्हापूर येथे पुणे न्यूज एक्सप्रेसचा  राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा  थाटात संपन्न.

60 मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर -  लोकशाहीला बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी बळकट व मजबूत राहण्याची गरज आहे असे समाजवादी प्रबोधनीचे  सरचिटणीस श्री - प्रसाद कुलकर्णी प्रसाद कुलकर्णी यांनी प्रतिपादन केले.ते कोल्हापूर येथे झालेल्या  पुणे न्यूज एक्सप्रेसच्या पुरस्कार सोहळ्यात  आपल्या अध्यक्ष भाषणात बोलत होती  कोल्हापूर येथे रविवार दि.25ऑगस्ट रोजी मान्यंवराच्या उपस्थित महाराष्ट्र पत्रकार संघ ,मुंबई या हॉल मध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला . या कार्यक्रमास प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. 


  या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते वृक्ष रोपला जलवाहुन करण्यात आली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.  प्रमोदिनी माने यांनी केले. 

तळागाळातील जनहितार्थ काम करणारे पत्रकार व सामाजिक, शैक्षणिक, उद्योग व्यवसाय, क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित करणे हा खरा पुरस्कार 

         फिरोज मुल्ला(सर)

. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पत्रकार व पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष फिरोज मुल्ला (सर)  आपले मनोगत व्यक्त करताना  म्हणाले की पुणे न्युज एक्सप्रेस सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी निर्भिडपणे काम करत आहे पुरस्कार जे दिले जातात ते मोठ मोठ्या लोकांनाच दिले जातात सर्वसामान्य व्यक्तीच्या कर्तबगारी करणाऱ्याला पुरस्कार दिले जात नाही म्हणून पुणे न्युज ऐक्सप्रेसच्या वतीने सर्वसामान्य व्यक्तींना पुरस्कार देऊन त्यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप देत आहे पेपर मध्ये चांगल्या व खऱ्या बातम्या येणे ही काळाची गरज आहे आज देशभर व महाराष्ट्र राज्यात आपण बघीतलतर तीन वर्षांपासून ते सत्तर वर्षाची महिला सुरक्षित नाही छत्रपती शिवाजी महराजांच्या राज्यात महिला सुरक्षित नाही हे निंदनीय लाजीरवाणी बाब आहे सरकारने यावर गंभीर होऊन कडक कायदे केले पाहिजे सरकार मधले बसलेले लोक निवडणूकीच्या तयारीला लागले आहेत पण जनतेला न्याय कधी मिळणार असा प्रश्न पडलेला आहे पण तुम्हाला आम्हाला खूप काम करावे लागणार आहे अन्याय विरुद्ध न्यायासाठी आवाज उचलावे लागेल तरच न्याय मिळेल  पुरस्कार मिळाल्या नंतर जवाबदाऱ्या वाढतात अन्याय अत्याचार विकास कामे तरुणांसाठी बेरोजगारी शिक्षण राष्ट्रीय ऐकात्मता या सर्व बाबींना खिळ बसत असेल तर आपण पत्रकारांनी प्रखडपणे लिहिले पाहिजे असे मत फिरोज मुल्ला(सर) यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

पाच हजाराचा मोबाईल व पत्रकारिता -- ज्येष्ट संपादक श्री सागर बोराडे.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व ज्येष्ट संपादक श्री सागर बोराडे सर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की आज ची पत्रकारिता म्हणजे पाच हजाराचा स्मार्ट मोबाईल फोन घेऊन केली जाते पत्रकारितेचे अपूर्ण  ज्ञान , शुद्धलेखन नाचा अभाव व नीट उद्घाटन हा शब्द नीट लिहिता येत नाही अशी पत्रकारिता आहे. 

पुणे न्यूज एक्सप्रेसचे अभिनंदन : संपादक दीपक ढवळे 

या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती साप्ताहिक प्रगत हिंदुस्थानचे संपादक  श्री दीपक ढवळे यांनी पुणे न्यूज एक्सप्रेस कामाचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले.

ऐतिहासिक सोहळा - संपादक डी एस शिंदे 

साप्ताहिक घर प्रमुख चे संपादक  श्री . डी एस शिंदे आणि आपलं मनोगत व्यक्त करताना म्हणाले की  पुणे न्यूज एक्सप्रेसचा पुरस्कार वितरण सोहळा हा ऐतिहासिक ठरला आहे

पुणे न्युज एक्सप्रेस च्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन मुख्य संपादक मेहेबूब सर्जेखान यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. 








या वेळी मान्यंवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना  पुणे न्यूज एक्सप्रेसचे मुख्य संपादक मेहबूब सर्जेखान यांची प्रंशसा करुन त्यांना पुढ़ील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.त्यानंतर सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यंक्तींचा मान्यंवरांच्या हस्ते ट्रॉफी आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.या वेळी आपला सन्मान होत असलेला पाहून पुरस्कारकर्ते भांबावून गेले होते.त्यांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता. पुरस्कार प्राप्त झालेल्या व्यक्तीनी संयोजकाचे आभार मानले.

या वेळी या कार्यक्रमाचे प्रायोजक श्री.वीरभद्र अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी ,कोल्हापूर या संस्थेचे संस्थापक चेअरमन श्री.संतोष कृष्ण स्वामी यांनी पुणे न्युज एक्सप्रेसच्या कामाची प्रंशंसा करून शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.स्वप्निल पन्हाळकर यांनी केले.या वेळी पुणे न्युज एक्सप्रेसचे मुख्य संपादक मेहबूब   सर्जेखान, या  कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.प्रसाद कुलकर्णी, प्रमुख पाहुणे श्री.सागर बोराडे , श्री.फिरोज मुल्ला सर , श्री.धोंडीराम शिंदे ,श्री. दिपक ढ़वळे श्री.संतोष जंगम (स्वामी) ,श्री.अब्दुल रशिद,दै.परतगंगाचे संपादक सखाराम जाधव, सौ. प्रमोदिनी माने, श्रीकांत कांबळे ( उप संपादक) आणि पुणे न्युज एक्सप्रेसचे  व प्रेस मीडिया लाईव्ह चे कोल्हापूर जिल्हा प्रतिनीधी श्री.मुरलीधर कांबळे यांच्यासह विविध दै.पत्रकार ,छायाचित्रकार प्रिंट मिडीया , इलेक्ट्रॉनिक मिडीया , पुरस्कारकर्ते व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ.मुंबईचे पदाधिकारी उपस्थित होते.



Post a Comment

Previous Post Next Post