सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठास NAAC मूल्यांकनासाठी करावी लागते कसरत...

 


प्रेस मीडिया लाईव्ह

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने  NAAC मूल्यांकन करण्यासाठी मुदतवाढ घेतली आहे. जानेवारी २०२५ मध्ये विद्यापीठाचे   NAAC मूल्यांकन होणार आहे. ही मुदतवाढ घेण्याची  वेगवेगळी   कारणे समोर आली आहेत. नुकत्याच लोकसभा निवडणुका झाल्या. त्यावेळी आचारसंहितेचे कारण दाखवून हे मूल्यांकन पुढे ढकलण्यात आले. 

याच दरम्यान विद्यापीठातील जवळपास १००  प्राध्यापकांची पदे रिक्त असल्याने नेमणुका झालेल्या नाहीत. नुकतताच पूर्णवेळ कुलसचिव  नियुक्तीचा वाद उघड झाला आहे. निवड केलेल्या कुलसुचिवांना  त्यांच्या मूळ महाविद्यालयाने प्राध्यापक पदावरून निलंबित केले आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पूर्ण वेळ कुलसचिव पद रिक्त आहे. जानेवारी २०२३ मध्ये घडलेल्या अनियमित रॅप सॉंगचे प्रकरण अद्याप संपलेले नाही,  या प्रकरणातील दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कोणती कारवाई करावी? याबाबत समिती नेमली आहे.

 विद्यापीठाच्या वेबसाईटवरील रँकिंग संदर्भातील माहितीवर एका नागरिकाने आक्षेप घेतला आहे. त्याबाबत विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे खुलासा मागविला आहे, विद्यापीठाने अद्याप खुलासा सादर केलेला नाही. एका प्राध्यापकावर फौजदारी गुन्हा  दाखल झाला  आहे. ही सर्व प्रकरणे  NAAC  मूल्यांकन समिती पुढे उघडकीस आल्यास विद्यापीठाचा  NAAC मूल्यांकन दर्जा घसरण्याची शक्यता  नाकारता येत नाही. त्यामुळे विद्यापीठाने  NAAC मूल्यांकनासाठी मुदतवाढ घेतली आहे, अशी चर्चा शैक्षणिक वर्तुळात होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post