प्रेस मीडिया लाईव्ह :
महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाच्या वतीने राज्यातील वीज उद्योगातील महावितरण महापारेषण व महानिर्मिती कंपनीतील वीज कंत्राटी कामगारांचे आज पासून राज्यभर साखळी उपोषण सुरू झाले आहे.
वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांना हरियाना सरकार प्रमाणे कंत्राटदार विरहित रोजगार व पगार वाढ मिळावी या साठी 12 ते 17 ऑगस्ट साखळी उपोषण राज्यभर सुरू करण्यात आले आहे. मागील आठवड्यात राज्यातील लोकप्रतिनिधी यांना निवेदन देवून या बाबतीत कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी विनंती केली आहे.
पुण्यातील विद्युत भवन रास्ता पेठ येथे अध्यक्ष सुमित कांबळे व सचिव निखिल टेकवडे , चंद्रकांत नागरगोजे, अभिजीत मुळे, सुरज चव्हाण यांच्या नेतृत्वात साखळी उपोषण सूर झाले आहे.रास्ता पेठ पुणे उपोषणाला विविध सामाजिक संस्था, राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी पाठींबा दिला आहे.
20 ऑगस्ट रोजी राज्यातील प्रत्येक मंत्री यांच्या घरासमोर एक दिवसीय आंदोलन होणार आहे व 24 ऑगस्ट रोजी नागपूर येथील रेशीमबाग मैदान ते ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे घरी पायी मोर्चा काढून तेथे आमरण उपोषण व आंदोलन होणार आहे अशी माहिती संघटनेचे प्रदेश अध्यक्ष निलेश खरात यांनी दिली.
ऊर्जामंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी योग्य तोडगा काढून त्यांच्या उर्जा खात्यातील कामगारांना न्याय द्यावा अशी अपेक्षा संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी व्यक्त केली आहे.
निलेश खरात
अध्यक्ष सचिन मेंगाळे
सरचिटणीस
9422037029
महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघ )संलग्न भारतीय मजदूर संघ)
9422037029
sachinmbms@gmail.com