पुणे : आज लाडकी बहीण योजनेचा भव्य शुभारंभ

 या पार्श्वभूमीवर या परिसरातील वाहतुकीत मोठे बदल 



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना महायुती सरकारने जाहीर केली आहे. या योजनेचा ३ हजार रुपयांचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. या योजनेचा भव्य शुभारंभ आज केला जाणार आहे. या साठी पुण्यातील बालेवाडी स्टेडियममध्ये आज भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर या परिसरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहे. त्यामुळे या परिसरात येतांना वाहतूक बदलांची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.


राज्यात लाडकी बहीण योजनेसाठी सर्वाधिक अर्ज हे पुणे जिल्ह्यातून आले आहे. तसेच राज्यातून देखील या योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय झाल्याची टीका महायुती सरकारवर करण्यात आली आहे. असे असले तरी आज या योजनेचा भव्य शुभारंभ होणार असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक मोठे नेते आज पुण्यात उपस्थित राहणार आहे. तसेच या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात महिला देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.


यामुळे पुणे- बंगलूर हायवे, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे व मुंबई-पुणे जुना हायवे तसेच बालेवाडी परिसरातून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यावर वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी उपाय योजना करण्याबाबत सुचना जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिल्या होत्या. तसेच पुणे-सोलापूर, पुणे-सातारा, पुणे अहमदनगर, पुणे- नाशिक, पुणे मुंबई (जुना) व पुणे मुंबई एक्स्प्रेसवे या मार्गावरील सर्व प्रकारची जड अवजड वाहनांची वाहतुक बंद करण्याच्या देखील सूचना दिल्या होत्या. त्यानुसार वाहतुक कोंडी टाळण्यासाठी आज पहाटे १ पासून ते रात्री १२ वाजेपर्यंत पुणे-सोलापूर, पुणे-सातारा, पुणे- अहमदनगर, पुणे नाशिक, पुणे मुंबई (जुना) व पुणे मुंबई एक्स्प्रेसवे या मार्गावरील सर्व प्रकारची जड- अवजड वाहनांची वाहतुक ही बंद ठेवली जाणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post