माजी गृहराज्यमंत्र्याच्या मुलगाच चालवीत होता बेकायदा हुक्का पार्लर ,

गृहराज्यमंत्र्याच्या मुलांसह  पाच जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल  

प्रेस मीडिया लाईव्ह :

 पुणे : माजी गृहराज्यमंत्र्याच्या मुलाच्या  कोंढवा परिसरातील "द व्हिलेज' या हॉटेल वर  सुरू असलेल्या बेकायदा हुक्का पार्लरवर पोलिसांनी शुक्रवारी छापा टाकून  बाकीर रमेश बागवे ( वय ३६, रा. लोहियानगर , भवानी पेठ), हरून नबी शेख ( वय २५), बिक्रम साधन शेख ( वय २५), अमानत अन्वर मंडल ( वय २२) आणि अमानत अन्वर ( वय२४, सर्व रा. प. बंगाल ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे.  पाच जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 या बाबत अधिक माहिती अशी की बाकीर बागवे हा संबंधित हॉटेलचा चालक असून अन्य चौघे तेथील कर्मचारी आहेत. त्यांच्याकडून २३ हजार ५०० रुपये किमतीचे तंबाखूजन्य हुक्‍क्‍याचे प्लेव्हर्स आणि काचेचे नऊ हुक्का पॉट जप्त करण्यात आले आहेत. बाकीर बागवे हा माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांचा मुलगा आहे.

एनआयबीएम रस्त्याच्या परिसरात असलेल्या "द व्हिलेज' या हॉटेलमध्ये बेकायदा हुक्का दिला जात असल्याची खबर कोंढवा पोलिसांच्या पथकास मिळाली. त्यानुसार, माहिती कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलिस निरीक्षक ( गुन्हे) मानसिंग पाटील व त्यांच्या पथकाने गुरुवारी रात्री संबंधित हॉटेलवर छापा टाकला. तेथे बेकायदेशीरपणे हुक्का पार्लर सुरू असल्याचे उघडकीस आले. यावेळी पोलिसांनी काहीजणांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्यांना अटक केली. 

Post a Comment

Previous Post Next Post