प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे-लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य उपेक्षीत वंचित समूहाचे व्यथा मांडणारे होते असे प्रतिपादन सेवानिवृत्त कर्नल सुरेश पाटील यांनी केले पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती महोत्सव २०२४ निमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे “गौरव पुरस्कार” वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. हा पुरस्कार वितरण सोहळा 1971 च्या भारत-पाक युद्धामध्ये शत्रूच्या हल्ल्यात जखमी झालेले निवृत्त सेनानी कर्नल सुरेश पाटील यांच्या हस्ते विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले
हा पुरस्कार सोहळा संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय नेते फिरोज मुल्ला (सर) यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आला या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोषजी आठवले उपस्थित होते
या वेळी लतेंद्र भिंगारे (कराटे), सलीमभाई शेख (शिक्षण ) , मनोज सुर्यवंशी (सामाजिक), विशाल जाधव(सामाजिक), गणेश गुंजी(सामाजिक), पै.कु.गायत्री जाधव(कुस्ती),नरेश बनसोडे (सामाजिक), इतर अनेक व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले
या सोहळ्याला प्रमुख पाहुणे अशोक कांबळे ज.सेक्रेटरी लोक जनशक्ती पार्टी, महेबुब सर्जेखान मुख्य संपादक प्रेस मिडिया लाईव्ह, गौसिया खान महिला प्रदेशाध्यक्षा छ.शिवाजी मुस्लिम ब्रिगेड, अरुण भिंगारदिवे सं.अध्यक्ष शिवशक्ती भीमक्रांती,रफीकभाई कुरेशी अल्पसंख्याक विकास महासंघ,चाँदभाई बलबट्टी, नाशीर इनामदार,राज भोकरे रिपब्लिकन प्रेसिडियम पार्टी आँफ इंडिया, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष जयसिंगराव कांबळे, नीतीन घावट,पुणे जिल्हा महिला अध्यक्षा सौ. वैशालिताई शिंदे छ.शिवाजी मुस्लिम ब्रिगेड आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी विशेष उपस्थित म्हणून महिला प्रदेश अध्यक्षा सौ मिराताई वहर,(मुंबई) प्रा.आरुण मेढे प्रदेश उपाध्यक्ष,(मुंबई), महिला प्रदेश कार्यकध्यक्षा सौ.सिंधुताई तुळवे,महिला प्रदेश संघटीका सौ.ज्योतीताई झरेकर,पुणे शहर महिला अध्यक्षा सौ.विजयाताई खटाळ, पालघर महिला अध्यक्ष सौ. जोश्नाताई मंत्री,हे उपस्थित होते
या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन प्रदेश सदस्य रईसभाई खान, पुणे शहर अध्यक्ष संदीपभाऊ शेंडगे, पुणे शहर कार्य अध्यक्ष हासीमभाई खान,पुणे शहर उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कुंबळे यांनी केले
Tags
पुणे