प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : यंदाचा पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यास मंडळांचा बक्षीस समारंभ आणि विद्यार्थी शिष्यवृत्ती समारंभ रविवार दिनांक १ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ४.00 वाजता शिवाजीनगर पोलीस मुख्यालय या ठिकाणी संपन्न होणार असून याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून "केंद्रीय सहकार राज्यमंत्री माननीय मुरलीधर मोहोळ व पुण्याचे पोलीस आयुक्त माननीय अमितेश कुमार" हे उपस्थित राहणार आहेत.
सर्वांनी या मध्ये सहभागी होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी व या कार्यक्रमाच्या नियोजनात सहभागी व्हावे अशी आदरपूर्वक विनंती करण्यात येत आहे. या कार्यक्रमाची सुरवात ४ ते ५.३० विद्यार्थी शिष्यवृत्ती समारंभ होईल यामध्ये विद्यार्थी, पालक, शिक्षक सहभगी होतील व ६.३० पासून मंडळ बक्षिस समारंभ घेण्यात येईल. यामध्ये मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत .
आपला स्नेहांकित
"श्री. संदीप सिंह गिल्ल पोलीस उपायुक्त परिमंडळ एक तथा सचिव पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यास"
आपला नम्र
डॉ.मिलिंद भोई
विश्वस्त -विघ्नहर्ता न्यास ,पुणे पोलीस