शहरातील खड्ड्यांविरोधात बँड बाजा वाजवून महापालिकेसमोर आप चे आंदोलन

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे शहरातील सर्वच रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले आहे. शहरात पडलेल्या पावसानंतर अनेक ठिकाणचे रोड खराब झालेले असून शहरातील या समस्येकडे लक्ष वेधण्याकरता "आप" च्या वतीने पुणे महानगरपालिकेसमोर बँड बाजा आंदोलन करण्यात आले. महापालिकेतील अधिकाऱ्यांचा रस्ते तयार करणाऱ्या कंत्राटदारांवर कोणत्याही प्रकारचा कंट्रोल नाही. कंत्राटदारांकडून रस्ते तयार करताना निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरल्यामुळे रस्त्याची क्वालिटी अत्यंत तकलादू असते. छोट्याशा पावसात देखील रस्त्यावर अनेक खड्डे पडतात आणि हा सर्व प्रकार महापालिका अधिकारी डोळेझाक करून पाहत असतात. खरे पाहता रस्ता तयार केल्यानंतर डिफॉल्ट लायबिलिटी पिरियड संपेपर्यंत तरी त्यावर कोणत्याही प्रकारचे खड्डे पडू नयेत अशा अटी असतात परंतु या अटी कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याकडून काटेकोरपणे पाळल्या जात नसून अधिकारी व ठेकेदार यांच्यात असलेल्या देवानघेवाणीमुळेच अधिकारी वर्ग कंत्राटदारांच्या चुकीच्या कामाकडे दुर्लक्ष करतात असा आरोप यावेळी आम आदमी पक्षाच्या महाराष्ट्र राज्याचे कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील यांनी केला 

पुणे शहराचे खासदार आणि केंद्रातील राज्यमंत्री असलेल्या मुरलीधर मोहोळ यांनी काही दिवसांपूर्वी महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना खड्डे बुजवण्याचे आदेश दिले. त्यावर बोलताना आम आदमी पक्षाच्या वतीने सांगण्यात आले की, भारतीय जनता पक्ष आणि अधिकारी यांच्यात साटे लोटे असून नागरिकांना जरी त्रास होत असेल, परंतु भाजपकडून आदेश आले नसतील तर रस्ता दुरुस्तीची कामे दुरुस्त होत नाहीत अशी परिस्थिती आहे. महापालिकेत नगरसेवक नसल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कुठलाही दबाव नाही आणि या सर्व गोष्टींची परिणिती म्हणून नागरिकांना त्रास सोसावा लागत आहे. आम आदमी पक्ष अधिकाऱ्यांच्या अशा प्रवृत्तीचा जाहीर निषेध करतो तसेच येत्या चार दिवसात शहरातील खड्डे जर व्यवस्थित बुजवले गेले नाही तर त्याच खड्ड्यात साठलेले पाणी बाटलीत भरून महापालिका अधिकाऱ्यांना भेट देण्यात येईल. असे मत राज्य उपाध्यक्ष विजय कुंभार यांनी व्यक्त केले

आम आदमी पक्षाचे शहर अध्यक्ष धनंजय बेनकर म्हणाले,   शहरासह उपनगरांतील रस्त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करून निकृष्ट दर्जामुळे खड्डे पडुन रस्त्यांची दुरावस्था  झाली आहे. खड्डे व वाहतूक कोंडीमुळे होणाऱ्या अपघात निष्पाप पुणेकरांचे बळी जात आहेत.  नागरिक त्रस्त झाले आहेत. असे असताना अधिकारी टक्केवारीत गुंतले आहेत.  खड्डे भरूनही रस्त्यांची काही दिवसांतच खड्डे चाळण होत आहे.याकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले येत्या आठ दिवसांत खड्डे न बुजवल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.

पुणे महापालिकेवर केंद्रीय मंत्री श्री  मुरलीधर मोहोळ किंवा पालकमंत्री श्री अजित पवार यांचा बिलकुल अनुष राहिलेला नाही. या दोघांनी राजीनामे द्यावेत. सामान्य नागरिकांनी फक्त टॅक्स भरायचे आणि खड्यात पडून जीव द्यायचा का? शारीरिक मानसिक त्रास वेगळाच आहे. पालिका अधिकाऱ्यावर मनुष्य वधाचे खटले दाखल केले पाहिजेत.श्री सुदर्शन जगदाळे, पुणे शहराध्यक्ष,आम आदमी पार्टी

पुण्याचे खासदार आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रशासनाला 24 तासात खड्डे बुजवायला सांगितले. ' मोहोळ यांच्याकडे आहे आता हवाई अड्डा पण त्यांचेच ठेकेदार सांभाळतात पुण्याचा खड्डा, रस्त्यावरचे खड्डा हाच भ्रष्टाचाराचा अड्डा ' त्यामुळे ना प्रशासन त्यांचे ऐकते ना ठेकेदार. जी 20 च्या निमित्ताने पाचशे कोटी रुपये रस्त्यावर खर्च केले शिवाय दरवर्षीचे 50 कोटी खर्च होतात तरीसुद्धा खड्डे पडणे थांबत नाहीत. उत्तरदायित्व काळातील दंडही वसूल होत नाही हे गंभीर आहेत: मुकुंद किर्दत, प्रवक्ते, आप

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आदेश देऊनही अजून खड्डे बुजवले गेले नाही, अधिकारी टोलवा टोलवी ची उत्तरे देतात. यावर सामान्य नागरिक त्रस्त आहे. खड्ड्यामुळे वाहनांच्या रांगाच रंग लागत आहे. लवकरात लवकर खड्डे बुजवले जावे सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा 

अमित म्हस्के - युवा अध्यक्ष आप पुणे शहर आंदोलनाला उपस्थित कार्यकर्ते अभिजीत मोरे, निलेश वांजळे ,अमित मस्के, किरण कद्रे, फेबियन अण्णा सॅमसन , शिवाजी डोलारे,शीतल कांढेलकर, सुरेखा भोसले , सुनीता काळे ,माधुरी गायकवाड संजय कटारणवरे,किरण कांबळे, निखिल खंदारे ,प्रशांत कांबळे , अविनाश भाकरे , अमोल मोरे, निरंजन अडागळे, विक्रम गायकवाड, नितीन पायगुडे , रितेश निकाळजे .

Post a Comment

Previous Post Next Post