प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : ताडीवाला रोड येथे राहणाऱ्या अमली पदार्थ व्यसनाने व्यसनमुक्ती केंद्रात आत्महत्या केलेल्या अनूप लोखंडे या मुलाच्या कुटुंबीयांची त्यांच्या घरी शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांनी आज भेट घेतली आणि शिवसेना परिवाराच्या वतीने सांत्वन करण्यात आले . ड्रग्ज, अमली पदार्थ, गांजा विषयात गेल्या अनेक महिन्यांपासून पुण्यात वातावरण तापले असून रोज अश्या घटना घडत आहेत आणि मुख्यमंत्री, गृहमंत्री , महाराष्ट्र सरकार मधील मंत्री , प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे, पोलिस प्रशासन खरच या विषयात गांभीर्याने काम करीत आहे का हा प्रश्न पुणेकरांना पडला आहे .
यावेळी बोलताना शहरप्रमुख संजय मोरे यांनी मिंदे सरकार व पोलिस प्रशासनाला धारेवर धरत ड्रग्ज, अमली पदार्थ गरीबाच्या घरापर्यंत कसे पोहचलेत ? तरुणाईला नशेत बेधुंध करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे का ? यामध्ये सरकारच्या कोणा मंत्र्यांचा हस्तक्षेप आहे का ? या वाममार्गातून निर्माण होणाऱ्या संपत्तीवरच सत्ताधारी निवडणूका लढतात का ? पुणे शहराची ओळख आता काय असणार , गुजरात मार्गे महाराष्ट्रात पुण्यात येणारे ड्रग्ज वर गृहमंत्री , पोलिस प्रशासन काय काम करीत आहे हा मोठा प्रश्न आम्हाला आणि पुणेकरांना पडला आहे असे प्रश्न उपस्थित केले तसेच आत्महत्या केलेल्या मुलाच्या कुटुंबासोबत शिवसेना शेवटपर्यंत राहील असे आश्वासन दिले .
यावेळी शिवसेना नगरसेवक अविनाश साळवे, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, बाळासाहेब भांडे, विभागप्रमुख संतोष सोनवणे, राजेश मोरे, अजय परदेशी, शाखाप्रमुख राजेंद्र ठाकूर, बाबू जमादार, शिवाजी धनगर, सूर्यकांत गोविंदे, सचिन दरेकर, बबलू शेख, इतर शिवसैनिक उपस्थित होते .
अनंत रामचंद्र घरत
प्रसिद्धी प्रमुख पुणे शिवसेना