रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू

 तरुणाला न्याय देण्यासाठी वंचितचे उपोषण

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : हॉस्पिटलच्या हलगर्जीमुळे एका 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. रुग्ण दाखल करण्यासाठी 50000 रुपये डिपॉजिट भरावयास सांगण्यात आले. यात वेळेत योग्य उपचार न मिळाल्याने 4-5 लोकांचे आतापर्यंत मृत्यू झाले आहेत. मृत तरुण हा एकमेव कर्ता पुरुष होता. त्याच्या   घरात कोणीही कमवणारे नाही. त्यामुळे त्याच्या पत्नीला त्या ठिकाणी निदान जॉब मिळावा, जेणे करुन ती पोट भरू शकते, अशा मागण्या करून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यासाठी चंद्रकांत कांबळे यांनी उपोषण केले.

महिला आघाडी अध्यक्षा अनिता चव्हाण, महासचिव सारिका फडतरे, युवा आघाडी अध्यक्ष सोमनाथ पानगावे, पुणे शहर उपाध्यक्ष रफिक शेख, महासचिव शुभम चव्हाण, उपाध्यक्ष अजित वाघमारे, पुणे शहर उपाध्यक्ष विकास भेगडे पाटील, कोरेगाव पार्क भीमशक्ती मंडळ अध्यक्ष आणि काही मंडळांनी उपोषणस्थळी भेट दिली.

 वंचित बहुजन माथाडी कामगार आघाडीचे उपाध्यक्ष चंद्रकांत कांबळे हे तीन दिवसांपासून उपोषण करीत केले. प्रशासनाकडून आश्वासन मिळाल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. मात्र मृताच्या पत्नीला न्याय मिळाला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


Post a Comment

Previous Post Next Post