प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : 93 रजा मुदत शिक्षकांना मा. उच्च न्यायालयाने आदेश व मा. नगर विकास कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांचा आदेश येऊन सुद्धा 22 उर्दू व 7 मराठी शिक्षकांची काही काळ नियुक्ती थांबली होती , पण नामवंत वकील एडवोकेट अय्युब शेख यांनी दिवस-रात्र कष्ट घेऊन सत्य परिस्थिती पुणे मनपा आयुक्त यांना समजावून सांगून तसेच या प्रकरणाचे संपूर्ण कागदपत्रे निदर्शनास आणून दिल्यानंतर पुणे मनपा आयुक्तांनी दिनांक 31.07.2024 रोजी 29 शिक्षकांना उपशिक्षक ( 1 ते 5 वी ) या पदावरील नियमित वेतनश्रेणीत नियुक्तीचे आदेश देण्यात आले .
सदर या कामासाठी मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद , अन्वर मोमीन ( सकाळ ) , असलम मोमीन , सलीम पटेल , सोहेल पटेल , एजाज शाहा , नजीर शेख व अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारे जमील सर यांनी एडवोकेट आयुब शेख यांना मोलाची साथ दिली यांचे सोबत खामकर खेडेकर , जगताप भोर यांची सुद्धा बहुमूल्य साथ लागली.
14 वर्षाचा वनवास संपला....
गेल्या 14 वर्षापासून शिक्षकांना वनवास भोगावा लागला असून आपला हक्क मिळविण्यासाठी त्यांना रस्त्यावर उतरावे लागले , प्रसंगी आंदोलन करावे लागले त्यानंतर त्यांनी केलेल्या कष्टाचे चीज झाले व त्यांना मोठे यश मिळाले या यशाच्या मागे एडवोकेट अय्युब शेख यांचा सिंहाचा वाटा आहे हे कोणीही विसरणार नाही. या बाबत सर्वच स्तरातून एडवोकेट अय्युब शेख यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला आहे .