छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी फक्त ठेकेदार आणि अधिकारी नाही तर राज्य व केंद्र सरकारवर सुध्दा गुन्हे दाखल करा -- अरविंद शिंदे, अध्यक्ष-पु.श.काँ.क



प्रेस मीडिया लाईव्ह :

 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट भागातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला याच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, कोथरूड येथे महाराष्ट्र राज्य सरकार व केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शिवसेनेचे नेतेमंडळी ही सहभागी झाले होते.
    
 यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हाणाले की, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळतो ही अत्यंत लाजीरवाणी घटना असून छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राचा अपमान करणारी घटना आहे. राज्य सरकारमधील मंत्री आता आपली जबाबदारी झटकून केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत आहेत आणि आमच्या दैवताचा अपमान कदापी सहन केला जाणार नाही.

 महाराष्ट्रातील भाजपा युती सरकार हे कमीशनखोर आहे, हे सरकार सिमेंट, वाळू, विटा, लोखंड यातही कमीशन खाते, त्यांना कशाचीच लाज वाटत नाही. शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती उभारण्याचे काम ठाण्यातील नवखा, अनुभव नसलेला शिल्पकार आपटे याला दिले. या कामावर २.३६ कोटी रुपये खर्च करण्यात आले. तर ५ कोटी रुपये सौंदर्यीकरणावर खर्च करण्यात आले. वास्तविक पाहता छत्रपतींचा पुतळा उभारणीचे काम तज्ञ व अनुभवी व्यक्तीला दिले पाहिजे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संसदेचे उद्घाटन केले त्या वास्तूला गळती लागली, अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन केले मंदिराला गळती लागली, समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केले, त्याला भेगा पडल्या, हा नरेंद्र मोदींचा हातगुण म्हणायचे की काय असा प्रश्न आम्हाला पडतो.


 छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे निकृष्ट बांधकाम करून भाजपा सरकारने महाराष्ट्राची अस्मिता धुळीस मिळवली आहे. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या कामातही भ्रष्टाचार करणाऱ्यांना महाराष्ट्राची जनता कधीच माफ करणार नाही. शिवप्रेमी म्हणून या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो.’’
   यानंतर नगरसेवक चंदूशेठ कदम, शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे, पृथ्वीराज सुतार, संजय मोरे, गजानन थरकुडे, आम आदमी पक्षाचे अभिजीत मोरे, ब्लॉक अध्यक्ष रवींद्र माझीरे यांचीही भाषणे झाली.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड अभय छाजेड, कमल व्‍यवहारे, संगीता तिवारी, मनीषा आनंद, अजित दरेकर, मुख्तार शेख, गोपाळ तिवारी, शिवा मंत्री, राजेंद्र भुतडा, रविंद्र माझीरे, राजू ठोंबरे, रमेश सोनकांबळे, अजित जाधव, विशाल जाधव, विश्वास दिघे, उमेश कंधारे, संदिप मोकाटे, द. स. पोळेकर, हर्षद हांडे, शिवाजी भोईटे, हनुमंत पवार, यशराज पारखी, विवियन केदारी, प्रकाश पवार, शाम काळे, नयनाताई सोनार, शोभाना पन्नीकर, बेबी राऊत, सुनिता नेमुर, रमा भोसले, कांता ढोणे, सुंदर ओव्‍हाळ, शारदा वीर, उषा राजगुरू, कान्हुभाऊ सांळुके, शिवाजी सोनार, पांडुरंग गायकवाड, सोमनाथ पवार, स्वाती पवार, सुरेश तनपुरे, गणेश मारणे, गणेश जाधव, शिवसेना प्रमुख संदिप मोरे, गजानन थरकुडे, उमेश ठाकुर, महेश विचारे, युवराज मदगे, राज जाधव, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, पृथ्वीराज सुतार, योगेश मोकाटे, उमेश कंधारे, अमोल काळे, प्राची दुधाणे, मनीषा करपे, वंदना पोळ, इंदूबाई हुलावळे, बाबा जाधव आदींसह असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
 

Post a Comment

Previous Post Next Post