प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे :भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज पुणेच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) युनिटने १४ ऑगस्ट २०२४ रोजी फाळणी अत्याचार स्मरण दिवशी त्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला, ज्यांनी फाळणी च्या काळात प्राण गमावले होते.
एन एस एस च्या विद्यार्थ्यांनी आणि पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी, डॉ. उज्वला बेंडाळे(अधिष्ठाता), डॉ. ज्योती धर्म(उपप्राचार्य), आणि डॉ. विद्या ढेरे, (समन्वयक)यांच्या मार्गदर्शनाखाली इतर शिक्षकांबरोबर हा कार्यक्रम साजरा केला. त्यांनी दोन मिनिटे मौन ठेवून पीडितांना श्रद्धांजली अर्पित केली आणि सर्व नागरिकांमध्ये एकता आणि शांतता प्रोत्साहित करण्याचे वचन दिले.
एनएसएस स्वयंसेवकांनी विभागणीच्या वेळी पीडिताना आलेल्या हालअपेष्टाचा उल्लेख करणारी डॉक्युमेंट्री दाखवली. डॉ. उज्वला बेंडाळे यांनी विद्यार्थ्यांना एकतेची गरज स्पष्ट केली.
शिक्षक, NSS स्वयंसेवक आणि भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज पुणेच्या विद्यार्थ्यांनी एकजुटीने उभे राहण्याचे आणि धर्म, जात इत्यादी भेद मिटवून विविधतेत एकतेचे, समानतेचे आणि भ्रातृत्वाचे तत्त्व जपण्याचे शपथ घेतली.