दैनिक अप्रतिमचे संपादक रविराज ऐवळे यांच्या सह 11 जनांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे गौरव पुरस्काराने सन्मानित

पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना यांचा वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे :पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104 वी जयंती श्रमिक पत्रकार भवन येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . या वेळी समाजामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाज सेवकांना सेवानिवृत्त कर्नल सुरेश पाटील यांच्या शुभहस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फिरोज मुल्ला सर होते .



दैनिक अप्रतिम चे संपादक रविराज ऐवळे (जयसिंगपूर ) उदयसिंह मिसाळ (घोसरवाड ) कुमारी पैलवान गायत्री सतीश जाधव नसरापुर (भोर ) अमित सिद्रामप्पा गुंजी  लतेंद्र भिंगारे , विशाल जाधव , नरेश लाडू बनसोडे , सलिम हैदर शेख , दिलिप शंकर हजारे स्टाफ ऑफीसर होमगार्ड (कोल्हापुर ) , ईलियास शेख , मनोज रामचंद्र सुर्यवंशी (पुणे) योगेश विनोद भावसार (पिंपरी ) यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे गौरव पुरस्कारानी सन्मानीत करण्यात आले .

यावेळी पँथर आमी स्वराज्य क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष एस आठवले , लोकजनशक्ती पार्टीचे अशोक कांबळे प्रेस मिडिया लाईव्ह चे संपादक मेहबूब सर्जेखान यांनी मार्गदर्शन केले . या कार्यक्रमास प्रा . अरुण मेढे , मिराताई वहर ,गौसिया खान , ज्योती झरेकर , सिंधुताई तुळवे , विजया खटाळ जोत्सना मंत्री ,पुर्वा शिरसाट (वसई) वैशाली शिंदे , जयसिंग कांबळे (कोल्हापुर ) लक्ष्मीकांत कुंबळे , नितिनभाऊ घावट (सांगली ) सागर देवके ,दिपक  भिसे (इचलकरंजी ) आदी उपस्थित होते . स्वागत व प्रास्ताविक पुणे शहर अध्यक्ष संदिप शेंडगे यांनी केले तर आभार रईसभाई खान यांनी मानले

Post a Comment

Previous Post Next Post