उलगडले भारतातील सांस्कृतिक वैविध्य !
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटी (आझम कॅम्पस,पुणे कॅम्प) येथे स्वातंत्र्य दिनी, १५ ऑगस्ट रोजी संस्थेचे अध्यक्ष तसेच 'डॉ.पी.ए.इनामदार युनिव्हर्सिटी'चे कुलपती डॉ.पी.ए.इनामदार यांच्या हस्ते फंक्शन ग्राउंड येथे सकाळी ८. ३० वाजता ध्वजारोहण करण्यात आले .
त्यानंतर 'युनिटी इन डायव्हर्सिटी' संकल्पनेवर आधारित विशेष सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थी,विद्यार्थिनीनी सादर केला.संस्थेच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार,संस्थेचे सचिव प्रा.इरफान शेख,डॉ.एन.वाय.काझी,डॉ.अरिफ मेमन,डॉ.नाझीम शेख,शाहिद इनामदार,विश्वस्त,पदाधिकारी,प्राचार्य,शिक्षक आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
भारतातील समृद्ध सांस्कृतिक वैविध्य या सांस्कृतिक कार्यक्रमातुन उलगडून दाखविण्यात आले. त्यात ६ विद्यालयांचे १४२ विद्यार्थी सहभागी झाले.कार्यक्रमाच्या शेवटी 'मिले सूर मेरा तुम्हारा' गीतावरील सादरीकरणात उपस्थित सर्व सहभागी झाले.आझम कॅम्पस परिवारातील शैक्षणिक संस्था मिळून असेम्ब्ली हॉल येथे हा सांस्कृतिक कार्यक्रम सकाळी नऊ वाजता उत्साहात सादर करण्यात आला.