प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे: (मोहम्मद जावेद मौला)
पूना कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना +2 विभागाने लष्कर पोलिस स्टेशनमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि त्यांच्याशी असलेले आपुलकीचे नाते अधिक दृढ केले, तसेच रक्षाबंधनाच्या निमित्ताने पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी स्वयंसेवकांनी अनोख्या पद्धतीचा अवलंब केला. निसर्ग संवर्धनाचे महत्त्व सांगून त्यांनी स्वतः राख्या बनवून झाडांना बांधल्या. पर्यावरणाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी आणि निसर्गाशी आपले नाते दृढ करण्यासाठी हा उपक्रम एनएसएस स्वयंसेवकांनी साजरा केला.
यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावतकर. यावेळी पोलीस उपनिरीक्षक अवधूत देशमुख, उपनिरीक्षक विनायक गुजर, साहेब शेख, उपप्राचार्य इम्तियाज आगा, पर्यवेक्षक नसीम खान, जिमखाना संचालक डॉ. अय्याज शेख, एनएसएसचे कार्यक्रम अधिकारी अशद शेख, इम्रान पठाण, बाबा शेख, एनसीसी अधिकारी सब लेफ्टनंट डॉ. मोहम्मद शाकीर शेख, एनएसएसचे कार्यक्रम अधिकारी डॉ. अकबर सय्यद, वसुधा व्हाव्हळ, सलमान सय्यद उपस्थित होते.