महंत रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्माचे आदर्श स्थान असणारे पैगंबर मोहम्मद(स्व.अ. स.)साहेब यांच्यावर खालच्या पातळीवर जावून वक्तव्य केले आहे त्याचा जाहीर निषेध
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे.. पॅन्थर आर्मी स्वराज क्रांती सेनेच्या वतीने स्वस्थापक अध्यक्ष फिरोज मुल्ला (सर )यांच्या नेतृवाखाली पुणे निवासी जिल्हाधिकारी मा. ज्योती कदम यांना निवेदन देण्यात आले यावेळी पुणे शहर अध्यक्ष संदीपभाऊ शेंडगे उपस्थित होते
बंगला देशामध्ये हिंदुवर जे अन्याय अत्याचार होत आहेत ते तातडीने थांबले पाहिजे माणुसकीला कालिंबा फासणारी घटना घडत आहेत याचा आम्ही जाहीर निषेध करतो
महंत रामगिरी महाराज यांनी पैगंबर मोहम्मद(स्व.अ.स.)साहेब यांच्यावर खालच्या पातळीवर जावून बेताल वकत्यव केले आहे त्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत स्वतःला धर्मगुरू समजणाऱ्या रामगिरी महाराजांनी प्रवचनामध्ये हिंदू धर्मावर प्रवचन करावे माणुसकीचे चांगले संदेश सांगितले पाहिजे इतर धर्मावर बोलणे टाळले पाहिजे
इकीकडे भारताचे प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी साहेब देशाला धर्मनिरपेक्ष संहितेची गरज आहे अस जाहीरपणे बोलतात आणि हिंदू मुस्लिम दोन जातीमध्ये तणाव निर्माण करणाऱ्या रामगिरी महाराजांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब जाहीरपणे बोलतात की महाराज तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही असे बेजवाबदारपणे बोलणे हे मुख्यमंत्री यांना न शोभणारे आहे आणि तेवढेच निंदनीय आहे
धर्माबद्दल प्रवचन करताना कुठल्याही धर्मगुरूने आपल्या धर्मामधील चांगले संदेश जनतेपर्यंत पोहचविले पाहिजेत परंतु अस रामगिरी महाराजांनी न करता काहीही कारण नसताना मुस्लिम धर्माच्या बाबतीत खालच्या पातळीवर जाऊन बेताल वकत्यव करून भावना भडकावल्या हे पुरोगामी महाराष्ट्र राज्याच्या परंपरेला कालिंबा फासणारे कृत्य आहे दोन जातीमध्ये दंगली भडकवणाऱ्या रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी असी मागणी आम्ही महाराष्ट्र सरकारकडे करत आहोत तरी देशात महाराष्ट्र राज्यात शांतता राहावी त्याकरिता सबंधितावर तातडीने कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन देण्यात आले