पुण्यात खड्ड्यांमुळे वंचित आयुक्तांच्या विरोधात आक्रमक
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : पुण्यातील रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पुणे महापालिकेच्या वतीने तात्पुरती डागडुजी करून दिखावापणा करत आहे. आधीच पुणेकर ट्राफिक मुळे त्रस्त असुन त्यात खंड्याची भरती म्हणून आज वंचित बहुजन आघाडी सर्व विंगसह आक्रमक भूमिका घेत खड्यात फुले लावून निषेध नोंदविला आणि आयुक्तांना खड्ड्यांचा अल्बम भेट दिला.
या वेळी पुणे शहर अध्यक्ष अरविंद तायडे यांनी प्रतिक्रिया देताना आक्रमक भूमिका घेतली ते म्हणाले की, राज्य सरकारची लाडकी बहीण योजना आहे तर आयुक्तांची लाडका ठेकेदार अशी योजना आहे का ? तीन दिवसात शहरातील सर्व खड्डे बुजवून घ्यावेत अन्यथा वंचित बहुजन आघाडी महानगरपालिकेवर आंदोलन करेल त्याचबरोबर आयुक्तांची खुर्ची खाली केल्याशिवाय गप्प बसणार नाही.
या आंदोलनात पुणे शहर अध्यक्ष ॲड अरविंद तायडे, अजय भालशंकर, सागर अल्हाट,वसंतदादा साळवे, अनिताताई चव्हाण, विश्वास गदादे, प्रा.बी.पी सावळे विशाल कसबे, गौतम ललकारे, बाळासाहेब बनसोडे, नितीन कांबळे, सतीश रणवरे, उमेश साळवी, विशाल वंजारी, विनोद जाधव, सारिका फडतरे, ॲडरेखा चौरे, रविंद्र गायकवाड, शाम गोरे, ओंकार कांबळे, अभिजीत बनसोडे, रोहित भोसले, परशुराम बनसोडे, ओम तांबे, प्रणिती क्षीरसागर, दादासाहेब गायकवाड, हिरामण वाघमारे यांच्यासह वंचित बहुजन आघाडी पुणे शहर, महीला आघाडी, माथाडी कामगार आघाडी, युवा आघाडी, सम्यक विद्यार्थी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच हितचिंतक यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.