कलेक्शन बॉक्सेसचे मोफत वितरण
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : कागदी झेंडे १५ ऑगस्ट नंतर पायदळी न जाऊ देण्यासाठी भारत फ्लॅग फाऊंडेशन तर्फे अभियान आखण्यात आले आहे. फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गिरीश मुरुडकर,कार्यकारी अध्यक्ष राहुल भालेराव यांच्या उपस्थितीत ठिकठिकाणी झेंडे कलेक्शन बॉक्सेसचे व ध्वजनियमावलीचे मोफत वितरण करण्यात आले .भारत फ्लॅग फाउंडेशनचे हे २२ वे वर्ष असून झेंडे पायदळी न जाऊ देण्याचा उपक्रम यंदाही सुरू आहे, असे मुरुडकर यांनी सांगीतले. मोती चौक(बुधवार पेठ) येथील विद्याप्रसारिणी सभेच्या शेठ हिरालाल सराफ प्रशालेत गिरीश मुरुडकर यांच्या उपस्थितीत विश्वस्त केशव कुलकर्णी यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापिका मनीषा हवालदार,शिक्षक श्री.सुरवसे ,वैशाली विसाळ,सुचित्रा पाटील,श्री.कसबे उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांना झेंडे कलेक्शन बॉक्स देण्यात आले आणि माहितीपत्रक देऊन जागृती करण्यात आली. यावेळी बोलताना श्री गिरीश मुरुडकर यांनी शारीरिक फिटनेस राखण्याबाबत मुलांना प्रोत्साहित केले .जुनाट संकल्पना सोडून देशासाठी कणखर होण्याच्या त्यांच्या भाषणाला उपस्थितांकडून दाद मिळाली. मुलांना तिरंगी बॅच व खाऊचेही वाटप यावेळी करण्यात आले.