संविधान जागर यात्रेत संविधानाच्या उद्देशिकांचे वाचन

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे ः गंज पेठेतील सावित्रीबाई फुले स्मारक गंज पेठ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आणि इंदिरा गांधी यांनी आणीबाणीत नव्याने तयार केलेली संविधानाची उद्देशिकांचे वाचन करण्यात आले. संविधान जागर समितीच्यावतीने संविधान जागर यात्रेनिमित्त हे आयोजन करण्यात आले. 

संविधान जागर यात्रा सोमवारी पुणे शहरात आली होती. या वेळी आकाश अंभोरे यांचे कडून दोन प्रकारच्या उद्देशिकांचे वाचन झाले. प्रास्ताविकात नितिन मोरे यांनी महाराष्ट्रात मुस्लिम समाजाकडून मागासवर्गीयांवर वारंवार हल्ले होत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कसलाही विश्वास ठेवणे आता कठीण आहे असे मत व्यक्त केले.

 यात्रेत विविध विषयांवरील ठराव वाचन व मान्यता घेण्यात आली. 

अॅड वाल्मीक निकाळजे म्हणाले, "संविधानिक राज्याचे सर्व व्यवहार संविधानिक निचयमांनी व्हावे. बाबासाहेबांनी इथले जुने कायदे १०० वर्षापूर्वी सोडून आता संविधनिक नियम स्वीकारले तर मुस्लिम त्यांचे शरीयत कायदे अजून किती दिवस संविधानाच्या विरोधात सुरू ठेवणार आहेत. देशाला सर्वाधिक धोका कम्युनिस्ट व समाजवादी लोकांकडून आहे, 

संविधान बदलणार असे म्हणजे बाबासाहेबांच्या संविधानाला कूचकामी म्हणण्यासारखे आहे. " सूत्रसंचालन नागसेन पुंडगे यांनी केले तर सभा यशस्वी होण्यासाठी स्थानिक चंद्रकांत काळोखे, रजनीकांत भोसले, निशांत ननावरे या कार्यकर्त्यांसमवेत यात्रेतील संतोष गवळी, संजय भालेराव, पंकज सुरवसे, अशोक गायकवाड, भरत ओव्हाळ यांनी विशेष प्रयत्न केले. योजना ठोकळे, स्नेहा भालेराव, राजेंद्र गायकवाड, विजय गव्हाले आदी उपस्थित होते.  समारोपाला सामूहिकरीत्या संविधान जागर गीत म्हटले गेले. 

---

पुस्तकाचे प्रकाशन - 

यात्रेत संविधान जागर समितीने लिहिलेले "कधीच न बदलणारे संविधान व त्याच्या हत्येचा प्रयत्न करणारी काँग्रेस" या विषयाचे पुस्तक, तसेच मागील कालखंडात मुस्लिमांकडून दलित वंचितांवर झालेल्या अन्यायाच्या घटनांचा रिपोर्ट समितीच्या वतीने प्रकाशित करण्यात आला. बौद्ध, मातंग, चर्मकार, खाटीक, वाल्मिकी व बुरुड अशा विविध समाजातून लोक उपस्थित होते.  व झालेल्या विषयांबाबत समाधान व्यक्त केले. 

संपूर्ण सभेचे  

----

ठराव - 

-  देशातील ७० वर्षांची घराणेशाही उलथवून सर्वसामान्यांच्या हातात सत्तेची चावी केवळ संविधानामुळे शक्य झाले. 

-

नोकरीतील पदोन्नती व नवबौध्द आरक्षण इंदिरा गांधी यांनी रोखले होते. ती अटलजी द्वारा सुरवात व आरक्षण मुदतवाढ करणाऱ्या केंद्र सरकारचे अभिनंदन 

-  संविधानाच्या मार्गाने प्रगती करत राहिला तर बाबासाहेबांच्या म्हणण्यानुसार भारत लवकरच महासत्तेच्या दिशेने वाटचाल करेल 

------------

Post a Comment

Previous Post Next Post