आम आदमी पक्षाच्या वतीने अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना राखी बांधून राखी पौर्णिमा साजरी....



प्रेस मीडिया लाईव्ह :

आम आदमी पक्षाच्या वतीने राखी पौर्णिमेचे औचित्य साधक शहरातील अनेक दुर्घटनांच्या वेळी आपले योगदान देऊन शहरातील नागरिकांचे रक्षण करणाऱ्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना राखी बांधून राखी पौर्णिमा साजरी करण्यात आली. अग्निशमन दलाचे कर्मचारी हे पूर परिस्थिती असो, आग लागलेली असो, एखादं झाड पडलेले असे किंवा शहरावर आलेल्या इतर कोणतेही संकट असो नेहमी नागरिकांच्या मदतीसाठी धावून येतात याचीच जाणीव ठेवली राखी पौर्णिमा वेगळ्या पद्धतीने साजरी करण्याच्या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी आम आदमी पक्षाच्या वतीने.सुरेखा भोसले महिला अध्यक्ष आरती कारंजवणे, माधुरी गायकवाड, कविता गायकवाड, निरंजन अडागळे हे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post