प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : आता चौका चौका मध्ये वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्यांवर आता इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम या प्रणाली द्वारे कारवाई करण्यात येणार आहे. तंत्रज्ञान आधारित ही यंत्रणा असणार आहे त्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन केलं तर अवघ्या पाचव्या मिनिटाला दंडाची पावती थेट तुमच्या मोबाईलवर फोटोसह मिळणार आहे. त्यासाठी पोलीस ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकीग्नेशन कॅमेरा ची मदत घेणार आहेत.
खरंतर पुणे पोलिसांकडून प्रायोगिक तत्त्वावर सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. यासाठी सल्लागाराची नेमणूकही करण्यात येणार आहे. पुण्यातल्या चौका चौकात आधुनिक कॅमेरा द्वारे पुणे पोलिसांची यंत्रणा राबवण्यात येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही चुकूनही नियम तोडण्याच्या विचारात असाल तर लगेच तुम्ही पकडले जाणार आहात. AI तंत्रज्ञानाच्या मदतीने लगेचच तुमच्या दंडाची पावती आणि फोटो देखील मिळणार आहे. त्यामुळे पुण्यात वाहन चालवताना नियमांचे पालन हे करावंच लागणार आहे. अन्यथा दंड भरण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. तसंच जे वाहनधारक वारंवार नियम मोडतात त्यांच्या परवाना रद्द करण्याची सुद्धा कारवाई करण्यात येणार आहे.