प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे - (प्रतिनिधी) :
"निवृत्त बँक कर्मचाऱ्यांच्या व अधिकाऱ्यांच्या उत्साहाचे स्वागत करून सर्वांनी एकत्रितपणे सामाजिक कार्य करीत असल्याबद्दल संघटनेची प्रशंसा केली.जुन्या आठवणींना उजाळा देण्याचे कार्य निवृत्तीनंतर होत असते."असे प्रतिपादन बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रा अनिरुद्ध देशपांडे ह्यांनी केले.भारतीय मजदुर संघाशी संलग्न असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र रिटायर्ड एम्प्लॉइज ऑर्गनायझेशन च्या ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ४० सदस्यांचा सत्कार प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते,ते पुढे म्हणाले,"बदलत्या आर्थिक व सामाजिक परिस्थिती मध्ये निवृत्त बँक अधिकारी,कर्मचारी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून विविध सामाजिक प्रकल्पात पुढाकार घेत आहे ही प्रेरणादायी गोष्ट आहे.बँकिंग क्षेत्र हे समाज परिवर्तनाचे मोठे केंद्र झाले आहे. जागतिक स्तरावर आपल्या देशाची आर्थिक वाटचाल तिसऱ्या क्रमांकावर होत असतांना आर्थिक क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहेत.निवृत्त बँक कर्मचाऱ्यांनी स्वतःला सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून स्वतःला विविध सामाजिक प्रकल्पामध्ये गुंतवून घेण्याचे" आवाहनही या प्रसंगी उपस्थितांना केले.
बँक ऑफ महाराष्ट्रचे लोकमंगल येथील सरव्यवस्थापक के राजेशकुमार यांनी महाराष्ट्र बँकेच्या प्रगतीमध्ये निवृत्त बँक कर्मचाऱ्यांचा व अधिकाऱ्यांचा मोठा सहभाग असल्याचे आपल्या भाषणात आवर्जून सांगितले.
( फोटो मोहन घोळवे,बाळासाहेब फडणवीस, सत्कारार्थी सुनीता कोल्हटकर,संतोष गदादे,के राजेशकुमार,नारायण अचलेरकर, भास्कर माणकेश्वर )
कार्यक्रमाच्या सुरवातीला संघटनेचे राष्ट्रीय महासचिव नारायण अचलेरकर यांनी संघटनेच्या कार्याचा अहवाल सादर केला.गेल्या २५ वर्षापासून निवृत्त महाबँक सदस्यांचे प्रश्न सोडवण्या बरोबरच सामाजिक जाणिवेतून १८१ संस्थांना दोन कोटी २५ लाख इतक्या रकमेची आर्थिक मदत केल्याचे सांगितले.येत्या २१-२२ सप्टेंबर रोजी होणाऱ्या संघटनेच्या रौप्य महोत्सवी अधिवेशनाची माहिती यावेळी सर्वांना दिली.
कार्यक्रमास बाळासाहेब फडणवीस,मोहन घोळवे,संतोष गदादे ,के. राजेशकुमार,नारायण अचलेरकर,भास्कर माणकेश्वर,मधुसूदन निमकर आदींची मुख्य उपस्थिती होती.या प्रसंगी बापूसाहेब वाघमारे, अनिल तिकोटीकर,सुभाष रावळ,हिंदी साहित्यिक डॉ दामोदर खडसे यांनी मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन वीणा इतराज ह्यांनी केले.मुकुंद भस्मे यांनी आभार मानले.७५ वर्षे पूर्ण झालेल्या महाबँक ४० निवृत्त सदस्यांचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व मानपत्र देऊन प्रमुख पाहुण्यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
अधिक माहितीसाठी
नारायण अचलेरकर
महासचिव
9422459825
मोहन घोळवे,बाळासाहेब फडणवीस, सत्कारार्थी सुनीता कोल्हटकर,संतोष गदादे,के राजेशकुमार,नारायण अचलेरकर, भास्कर माणकेश्वर