कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नां बाबतीत मा ऊर्जामंत्र्यांच्या घरा समोर आमरण उपोषण



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : आचार संहितेची चाहूल लागल्या नंतर भारतीय मजदूर संघाशी संलग्न महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने ऊर्जा खात्यातील कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आता 12 ते 17 ऑगस्ट 2024 या कालावधीत  साखळी उपोषणाचा मार्ग पत्करला आहे. 20 ऑगस्ट 2024  रोजी सरकार मधील सर्व मंत्र्यांच्या दारात लाक्षणिक आंदोलन तर 24 ऑगस्ट 2024  रोजी रेशीमबाग मैदान ते राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्या नागपुरातील घरा पर्यंत मोर्चा काढून तेथे वीज कंत्राटी कामगार बेमुदत आमरण उपोषण करणार असल्याचे संघटनेचे प्रदेश अध्यक्ष निलेश खरात यांनी सांगितले आहे.  

तिन्ही वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांचे शोषण कायमस्वरूपी थांबण्यासाठी नॉमिनल मस्टर रोल किंवा हरियाना सरकार प्रमाणे कंत्राटदार विरहित वयाच्या 60 वर्षा पर्यंत शाश्वत रोजगार मिळवा, मागणी पत्रका प्रमाणे वेतनात वाढ मिळावी, व प्रलंबित समस्यां सोडवाव्यात या मागण्या करिता मागील कालावधीत अनेक  वर्षापासून सातत्याने पाठपुरावा चालू आहेत,  या बाबतीत मा उर्जा मंत्री यांनी आस्वासने दिली होती,  पण अद्याप पर्यंत अंमलबजावणी झालेली नाही या  साठी हे आंदोलन असल्याचे प्रदेश सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी कळवले आहे.  

राज्यातील सर्व संघटना व कामगार यांनी या निर्णायक आंदोलनास पाठिंबा द्यावा असे आवाहन संघटन मंत्री उमेश आणेराव यांनी केले. या बाबतीत संघटनेने सरकाराला व प्रशासनाला लेखी नोटीस दिली आहे.  


कळावे

आपले नम्र

निलेश खरात 

प्रदेश अध्यक्ष 

9822418395 


सचिन मेंगाळे 

प्रदेश सरचिटणीस 

9422037029


महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ ( संलग्न भारतीय मजदूर संघ )

mvkksangh@gmail.com

Post a Comment

Previous Post Next Post