विशेष वृत्त : थेरगाव रुग्णालयात पाण्याच्या फिल्टरमध्ये आळ्या ,दिशा एंटरपायजेसला काळ्या यादीत टाका - रविराज काळे

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

 पिंपरी: थेरगाव रुग्णालय येथे आज चैतन्य शिंदे यांच्या पत्नी अलका शिंदे यांनी तळमजल्यावर पिण्याच्या पाण्याचे फिल्टर मधून पाणी घेऊन आपल्या पतीला दिले असता त्यामध्ये अळ्या आढळून आल्या, त्यानंतर त्यांनी रविराज काळे यांना फोन केला तेथे पोहोचल्यानंतर संबंधित फिल्टरमध्ये मोठ्या प्रमाणात आल्या आढळून आल्या संबंधित रुग्णालय प्रशासनाला याबाबत तात्काळ कल्पना देऊन संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यास सांगितले व त्यांनी त्वरित दिशा इंटरप्राईजेस यांना कारणे दाखवा नोटीस बजावली व आरोग्य विभागाकडून दहा हजार रुपयांचा दंड देखील करण्यात आला.

       



     नियमानुसार प्रत्येक आठ दिवसांमध्ये दोन वेळा थेरगाव रूग्णालयात असणारे सर्व फिल्टर्स हे साफ करणे बंधनकारक असते जर त्या पाण्यामध्ये आळ्या आढळून येतात तर ठेकेदाराकडून कामात हलकर्जीपणा केला जात गेला आहे.त्यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून संबंधित ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्यात यावे.अशी मागणी केली. आम आदमी पार्टीचे रविराज काळे यांनी आळ्या असलेली पाण्याची बॉटल सोमवारी आयुक्तांना भेट देणार असल्याचे सांगितले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post