प्रेस मीडिया लाईव्ह :
पिंपरी : आज शैक्षणिक वर्ष सुरू होऊन अडीच महिने उलटल्यानंतरही आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळाले नाही.20 हजार विद्यार्थी अजून देखील शैक्षणिक साहित्यापासून वंचित आहेत. काही शाळांकडून यादी करण्याचे काम अत्ता चालू आहे.ही बाब गंभीर स्वरूपाची आहे.आपल्याच काही अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांना वंचित ठेण्याचे प्रकार चालू आहेत.
अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.ज्या दहा ठेकेदारांना साहित्य पुरविण्याचे काम दिले आहे.त्यां सर्व ठेकेदारांना जुलै अखेरपर्यंत साहित्य पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले होते.त्यानंतर मुदतवाढ देत 4 आॅगस्ट पर्यंत साहित्य पुरविण्यास सांगितले दोन वेळा मुदतवाढ देऊन सुद्धा शैक्षणिक साहित्य पुरविण्यात ठेकेदार अपयशी ठरले आहेत.जे साहित्य पुरविण्यात आले ते देखिल निकृष्ट दर्जाचे आहे.त्याची देखिल तपासणी करण्यात यावी.अधिकारी आणि ठेकेदार यानी आर्थिक हितसंबंध जोपासले का याची देखील चौकशी करावी सर्व ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे. आपण केलेल्या कारवाई संदर्भात आम्हास लेखी उत्तराद्वारे कळवावे.
मा. ऋषिकेश पिराजी कानवटे
प्रमुख संघटक रयत विद्यार्थी परिषद
7798425805