पिंपरी येथील बांधकाम व्यवसायिकाची 2 कोटी 77 लाख 3 हजारांची फसवणूक झाल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल

 

प्रेस मीडिया लाईव्ह : 

अन्वर अली शेख : 

चिंचवड  पिंपरी येथील एसास कन्स्ट्रक्शन अ‍ॅण्ड डेव्हलपर्सचे प्रवर्तक शाहजाद अख्तर अनिसुद्दीन, वय ः 51, राहणार ः 103/104 नेहरुनगर, पिंपरी हे तक्रारदार असून त्यांनी केलेल्या दिनांक. 12/12/2016  रोजी झालेल्या नोटरी करारनाम्यानुसार आरोपी सौ. विजया नामदेव पडवळ , पती नामदेव बबन पडवळ यांना दस्तनोंद करून देण्याचे कोणतेही अधिकार नसताना शाहजाद अनिसुद्दीन यांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने, शिवराम हाईट्स स.नं.5244 खराळवाडी, येथील एकूण क्षेत्रफळ 6500 चौ.मी. या क्षेत्रावर रॉयल बिल्डर्स भागीदारी संस्थेच्या वतीने बांधण्यात आलेल्या शिवराम हाईट्स या प्रकल्पातील एकूण 10 फ्लॅटची अप्रामाणिकपणे कपटाने विक्री करून सुमारे 2 कोटी 77 लाख 3 हजार रुपये स्वतःच्या फायद्यासाठी वापरली असल्याचा ठपका ठेवत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत पडवळ दाम्पत्याविरोधात कायदेशीर तक्रार दिली आहे. पोलीसांनी भारतीय दंड संहिता 1860 नुसार 406, 418, 420, 421, 465, 467, 468, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार बांधकाम व्यवसायिक शाहजाद अनिसुद्दीन यांनी म्हटले आहे की, जमीन विकसनाबाबत माझे ओळखीचे शोएब मुजावर यांनी 2016 रोजी म्हणाले पिंपरी, खराळवाडी येथे रॉयल बिल्डर यांनी शिवराम हाईट्स स.नं.5244 येथे सन 2014 मध्ये सुरु केले आहे. परंतु, रॉयल बिल्डर यांस शिवराम हाईट्सचा प्रकल्प दुसर्‍या व्यक्तिस चालवायला द्यायचा आहे. प्रकल्पाबाबत माहिती घेऊन रॉयल बिल्डरचे भागीदार नामदेव बबन पडवळ व विजया नामदेव पडवळ या दाम्पत्याची भेट घेतली त्यांनी मला सांगितले की, त्यांच्याकडे कोणते भांडवल नसल्याने कोणी ग्राहक बिल्डींगमधील फ्लॅट घेण्यास इच्छुक नाही. या प्रकल्पाचे काम माझ्या हाती घेवून पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.

रॉयल बिल्डरचे भागीदार विजया नामदेव पडवळ व नामदेव बबन पडवळ जागेचे मूळ मालक अशोक शिवराम नलावडे व इतर नलावडे कुटूंब यांच्याकडून विकसनासाठी दि.22/08/2016 रोजी नोटरी करून विनामोबदला संमती/मान्यतापत्र लिहून देण्यात आले. दि.22/08/2016 रोजी लिहून देण्यात आलेल्या विनामोबदला संमती/मान्यतापत्रानुसार रॉयल बिल्डर पडवळ व एसास कंन्स्ट्रक्शन अ‍ॅण्ड डेव्हलपर्स तर्फे मी, (शाहजाद अनिसुद्दीन) स्वतःचे नावे शिवराम हाईट्स प्रकल्पातील पहिल्या मजल्यावर 101 व 102 दुसर्‍या मजल्यावर 201 व 202, तिसर्‍या मजल्यावर 301, 302 चौथ्या मजल्यावर 401, 404, 405, पाचव्या मजल्यावर 501, 504 आणि सहाव्या मजल्यावरील संपूर्ण बांधकाम मला मिळणार होते. उर्वरित बांधकाम जागेचे मूळ मालक अशोक शिवराम नलावडे व इतर नलावडे कुटूंब (सर्वे नं.5244 खराळवाडी क्षेत्र 6500 स्क्वे.फुट) यांना मिळणार होते.

पिंपरी चिंचवड सहकारी बँक मर्यादित पिंपरी शाखा यांचे 2 कोटी रकमेचे किती कर्ज होते. त्याची थकबारी किती होती. याबाबत रॉयल बिल्डरचे भागीदार विजया नामदेव पडवळ व नामदेव बबन पडवळ यांनी मला कोणतीही माहिती दिली नाही किंवा कोणतेही कागदपत्र दाखविलेले नाही. व्यवसायात भांडवल आणि कामकाजाचे व्यवस्थापक यात येणार्‍या अडचणींमुळे दि.12/12/2016 रोजी भागीदार विजया नामदेव पडवळ रमेश नामदेव पडवळ यांनी त्याचा रॉयल बिल्डर या भागीदारामध्ये असणारा त्याचा वाटा मला हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्याचा प्रत्येकी एक टक्का वाटा राहणार होता.

सर्व भागीदारांचे संमतीनुसार यापुढे सर्व बँकेचे व्यवहार, ठेकेदारांचे हिशोब, ग्राहक, बँका व अन्य संस्था यांचेसोबतचे करारमध्ये माझे स्वाक्षरीने करण्यात येतील. त्यानुसार भागीदार विजया पडवळ, नामदेव पडवळ हे सर्व सरकारी, निमसरकारी कार्यालयांमध्ये तसेच, बँकांमध्ये माझी नोंदणी करून सर्व अधिकार सुपुर्त करतील. मी, रॉयल बिल्डरचे भागीदार पडवळ दाम्पत्याबरोबर करार केला असल्याने मिळकतीचे विकसन करण्याचे संपूर्ण अधिकार मला प्राप्त झाल्याने नामदेव पडवळ यांना वेळोवेळी रोख व चेक स्वरूपात एकूण 78 लाख रुपये दिले आहे. सदर प्रकल्पात माझे स्वतःचे 1 कोटी 87 लाख रक्कम गुंतवणूक करून 30 फ्लॅटचे 95 टक्के काम डिसेंबर 2019 पर्यंत पूर्ण बांधकाम पूर्ण केलेे आहे.

सन 2020 साली कोविड कालावधीत रॉयल बिल्डरचे भागीदार विजया नामदेव पडवळ, नामदेव बबन पडवळ यांची एक नोटीस प्राप्त झाली. सन 2018 पासून शिवराम हाईट्स या प्रकल्पावर काम पाहणे बंद केले. कोणतेही दस्त करणे शक्य होत नाही. एकमताने रॉयल बिल्डर या संस्थेतून काढून टाकण्याचे ठरविले आहे. त्यावेळी कोविड कालावधी चालू असल्याने बाहेर जाण्यावर अनेक निर्बंध असल्याने व माझी प्रकृती ठीक नसल्याने मी त्यांना कोणतेही उत्तर दिले नाही. कोविड काळात बांधकाम व्यवसायावर अनेक निर्बंध घालण्यात आले होते. माझी प्रकृती ठीक नव्हती, डॉक्टरांनी घरी व विश्रांतीचा सल्ला दिला होता. धावपळ करणेही शक्य नव्हते, औषधउपचाराकामी भरपूर खर्चही झाला.

दि.04/05/2021 रोजी माझे नातेवाईक इमरान शेख, जावेद शब्बीर शेख यांना फ्लॅटचे व्यवहार व उर्वरित प्रलंबित 5 टक्के कामे पूर्ण करण्यासाठी कुलमुखत्यारपत्रान्वये नोटरी करारनामा करून दिला. बांधकामाच्या ठिकाणी गेला असता नामदेव पडवळ व त्यांच्या मुलाने इमरान यास शिवीगाळ करून शिवराम हाईट्स या प्रकल्पावर येण्यास मज्जाव केला.

माझ्या तब्येतीत सुधारणा झाल्यावर 2022 साली मी, शिवराम हाईट्स या प्रकल्पाच्या ठिकाणी गेलो असताना पडवळ दाम्पत्याने माझा त्या प्रकल्पाशी काही एक संबंध नाही, असे बोलून मला प्रकल्पावर येण्यास मज्जाव केला. मी, वारंवार संपर्क केला प्रतिसाद दिला नाही. तसेच, मी दिनांक 12/12/2016 रोजी मला दिलेल्या भागीदारपत्राच्या अन्वये फ्लॅट नं.101 व फ्लॅट क्र.603 शाहीन छागला यास आणि फ्लॅट क्र.601 व फ्लॅट 602 हे फ्लॅट इरफान इनामदार यास अ‍ॅग्रीमेंट टू सेल करून विक्री केली होती. परंतु, त्यापैकी फ्लॅट नं.101 हा शमशुद्दीन अल्लाबक्ष नायब यास विजया नामदेव पडवळ व नामदेव बबन पडवळ यांनी माझे संमतीशिवाय परस्पर विक्री केली असल्याने निदर्शनास आले.

मी, ऑनलाईन वेबसाईटवर जावून शिवराम हाईट्स प्रकल्पाबाबत माहिती घेतली असता त्यावेळी माझ्या लक्षात आले की, दि.12/12/2016 रोजी झालेल्या नोटरी करारनाम्यानुसार आरोपी विजया नामदेव पडवळ, नामदेव बबन पडवळ यांना दस्त नोंद करून देण्याचे कोणतेही अधिकार नसताना माझी फसवणूक करण्याच्या उद्देशाने शिवराम हाईट्स स.नं.5244, खराळवाडी, पिंपरी येथे एकूण 6500 चौ.मी. या क्षेत्रावर रॉयल बिल्डर्स भागीदारी संस्थेच्या वतीने बांधण्यात आलेल्या शिवराम हाईट्स या प्रकल्पातील एकूण 10 फ्लॅटची किंमत रु.2,77,03,000/- रूपयांस प्रामाणिकपणे/कपटाने विक्री करून सदरची रक्कम स्वतःचे फायद्यासाठी वापरली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post