प्रेस मीडिया लाईव्ह :
पिंपरी-चिंचवडमधील निगडी, भोसरी आणि चिंचवड भागातील तीन हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा ईमेल हॉस्पिटलला मिळाला. त्या मेलमध्ये दहशतवादी संघटनेचे नाव वापरण्यात आले होते. हॉस्पिटल कडून पोलिसांना याची माहिती देण्यात आली होती. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या बॉम्बशोधक पथकाने रुग्णालयांना भेट देऊन संपूर्ण रुग्णालयांची पाहणी केली. मात्र, संशयास्पद वस्तू आढळून आल्या नाहीत.निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा ईमेल आला. त्यामुळे रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती. रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना माहिती दिली. निगडी पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली.
निगडी पोलिसांनी बॉम्बशोधक पथकाला पाचारण केले. पथकाने रुग्णालयाच्या संपूर्ण परिसराची झाडाझडती घेतली. मात्र कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. त्याचवेळी भोसरी परिसरातील मेडिक्लोव्हर आणि चिंचवडमधील मोरया या रुग्णालयांनाही अशाच प्रकारचे ईमेल आले.खबरदारी म्हणून पोलिसांनी दोन्ही रुग्णालयात जाऊन पाहणी केली. मात्र तेथे कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.
पुण्यातही बॉम्बची अफवा
पुण्यातही शनिवारी (18 ऑगस्ट) बॉम्ब असल्याची अफवा पसरली होती. पुण्यातील नोबल हॉस्पिटल आणि फिनिक्स मॉलमध्ये बॉम्ब असल्याचा ईमेल पुणे पोलिसांना मिळाला होता.