चिंचवड विधानसभेत आपकडून परिवर्तनाची तयारी, रविराज काळेंना उमेदवारीचे‌ संकेत

 


    प्रेस मीडिया लाईव्ह :

       पिंपरी : सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील निष्क्रिय नेत्यांमुळे चिंचवडचा विकास थांबला आहे. रस्ते, पाणी, वीज यासारखे मूलभूत प्रश्नदेखील आतापर्यंत सोडवले गेले नाहीत. आता संघर्षाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आम आदमी पक्ष विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे , अशी माहिती आपचे रविराज काळे  यांनी दिली.

येणा-या विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टी आणि इतर डाव्या विचारसरणीच्या पक्षांना एकत्र आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. विकासासाठी भरीव कार्य करणा-यांनादेखील एकत्र आणणार असल्याचे काळे म्हणाले.चिंचवड विधानसभा मतदारसंघातून पक्षाने आपल्याला उमेदवारी देतील अशी खात्री आहे. महाराष्ट्रातील सर्व 288 मतदारसंघांतून आम्ही निवडणूक लढवणार आहोत.असेही रविराज काळे यांनी सांगितले.

      रविराज काळे यांनी 2019 पासून रयत विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून सामाजिक कार्याची सुरुवात केली.पहिले आंदोलन रयत शिक्षण संस्थेमधील भ्रष्टाचार बाहेर काढला, पिंपरी चिंचवड शहरातील रस्ते सफाई कामगारांना किमान वेतन दराने पगार मिळवून दिला.पिंपरी चिचवड महानगरपालिकेतील आरोग्य विभागातील 220 कोटीच्या भ्रष्टाचाराची तक्रार ED कडे केली.पिंपरी चिंचवड शहरातील तरुणांना प्रभावित करणाऱ्या विविध समस्यांबद्दल तरुणांवर प्रभाव टाकण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्यास सुरुवात केली. त्यांनी शांतता, परस्पर आदर आणि लोकांमधील समजूतदारपणाच्या आदर्शांच्या युवकांमधील प्रचाराच्या घोषणेचे समर्थन केले. तरूणांना जगाच्या पाठीवर बळकटी देण्यासाठी आणि त्यांच्या गरजा समजून त्यांना संसाधने पुरवण्याचा हा एक सकारात्मक प्रयत्न आहे . पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक नागरिकास दोनवेळा पाणी, 300 युनिट मोफत,मोफत शिक्षण आणि मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार.




 

Post a Comment

Previous Post Next Post