प्रेस मीडिया लाईव्ह :
श्री बाळासाहेब माने शिक्षक प्रसारक मंडळ अंबप , संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन ,(बी.एड) पेठ वडगाव . या महाविद्यालय मध्ये सोमवार दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आर.एल.निर्मळे - चौगुले मॅडम यांनी भूषविले. कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथालय मधील विविध ग्रंथ, शब्दकोश, विविध साहित्य प्रकारातील पुस्तके यांचे प्रदर्शन, उद्घाटन व डॉ. एस. आर रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन अशा स्वरूपात झाले. ग्रंथालयातील विविध दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये सर्व साहित्य प्रकारातील पुस्तकांचा विद्यार्थ्यांनी वापर करावा हा त्यामागील उद्देश होता. ग्रंथालयातील प्रदर्शनाबाबत ग्रंथपाल चौगुले मॅडम यांनी सर्व विद्यार्थ्यांना माहिती दिली व ग्रंथालयातील विविध साहित्य प्रकारातील पुस्तकांचा लाभ घ्यावा व वाचन करावे याविषयी योग्य ते मार्गदर्शन केले. तसेच सहाय्यक ग्रंथपाल पाटील मॅडम यांनीही ग्रंथालयातील विविध पुस्तकांच्या विषयी माहिती देऊन डॉ. रंगनाथन यांच्या जन्मदिनादिवशी ग्रंथालय दिन का साजरा करतात ?..याविषयी माहिती दिली.
छात्राध्यापकांपैकी शीलाताई पाटील, सुरेश चौगुले या विद्यार्थ्यांनीही ग्रंथ प्रदर्शनाबाबत आपले विचार व्यक्त केले. प्राचार्या मॅडम , ग्रंथपाल मॅडम व विद्यार्थी यांच्या हस्ते डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. प्राचार्या मॅडम यांनी एस.आर.रंगनाथन यांच्याविषयी महिती सांगितली.तसेच ग्रंथालयाचे सिद्धांत सांगितले.प्रत्येक ग्रंथाला वाचक मिळाला पाहिजे. प्रत्येक वाचकाला त्याचा ग्रंथ मिळाला पाहिजे. वाचनाचे महत्त्व, ग्रंथालयाचे महत्व , गरज तसेच वाचनाने व्यक्तिमत्व कशा प्रकारे बदलते आणि त्याचा जीवन जगत असताना काय उपयोग होतो याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. प्रमुख उपस्थिती मध्ये प्रा.शिरतोडे व्ही. एल., प्रा.डॉ.पवार ए.आर.,प्रा.सोरटे एस. के., प्रा. सावंत ए. पी., ग्रंथालय सहाय्यक पाटील पी. व्ही उपस्थित होते. व तसेच द्वितीय वर्षांतील छात्राध्यापक ,छात्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आशा प्रकारे डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.