कु समीक्षा माने यांचा प्राचार्या डॉ. निर्मळे आर.एल. मॅडम यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन तिला गौरविण्यात आले.

  

प्रेस मीडिया लाईव्ह :

श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप, संचलित "कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड्.) पेठ वडगाव" महाविद्यालयातील माजी विद्यार्थिनी कु समीक्षा माने हिची  स्पर्धा परीक्षा सरळ सेवा भरती मधून जलसंपदा मध्ये सहाय्यक भांडारपाल पदी निवड झाल्याबद्दल यांचे तिचे महाविद्यालया मार्फत हार्दिक अभिनंदन करण्यात आले .महाविद्यालयामध्ये  प्राचार्या डॉ. निर्मळे आर.एल. मॅडम यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन तिला गौरविण्यात आले.कु. समीक्षा माने हिने आपल्या यशाचे श्रेय महाविद्यालयाच्या प्राचार्या निर्मळे मॅडम यांना देऊन त्यांच्या योग्य मार्गदर्शनाबाबत त्यांचे आभार मानले. 


स्पर्धा परीक्षा विषयी योग्य गाईडलाईन देऊन यांनी समीक्षा माने हिच्या यशामध्ये आपले योगदान दिले. मार्गदर्शनाबाबत समीक्षा माने हिने प्राचार्या निर्मळे मॅडम यांचे आभार मानले तसेच महाविद्यालयाविषयी कृतज्ञता व्यक्त केली. तिच्या पुढील वाटचालीसाठी महाविद्यालयातील प्राचार्या ,  सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी समीक्षा माने हिला तिच्या भविष्यातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

तसेच महाविद्यालयामध्ये पवित्र पोर्टल मधून सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये *रेवती मांढरेकर - (कोल्हापूर जिल्हा परिषद), पंडित शिंदे (सिंधुदुर्ग जिल्हा परिषद)*, *अकिक कोणकिरे (उर्दू माध्यम कोल्हापूर जिल्हा परिषद)*नम्रता शेट्टी(कोल्हापूर जिल्हा परिषद), अनुराधा लायकर, मेघा ओमाण्णा(रत्नागिरी जिल्हा परिषद),स्वरा पाटेकर(रत्नागिरी जिल्हा परिषद), संग्राम पाटील(कोल्हापूर जिल्हा परिषद), धनाजी खेडकर(कोल्हापूर जिल्हा परिषद)*  या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. 

त्याचबरोबर महाविद्यालयातील सी.टी.ई.टी.च्या परीक्षेमध्येहि विविध विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. त्यामध्ये ओमकार नाळे, अपर्णा चौगुले, तबस्सुम नदाफ, प्राजक्ता कुलकर्णी, अश्विनी पाटील, प्रमोद पाटील, राऊत एकनाथ, ज्योती शेटे, रवींद्र लोंढे, सुजाता कुंभार, इत्यादी विद्यार्थ्यांनी सी.टी.ई.टी. परीक्षेमध्ये यश संपादन केले आहे‌ . अशा सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाने मनापासून अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी त्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post