विशेष वृत्त : पँथर आर्मी आंदोलनाची राज्य सरकारने घेतली दखल ; मार्टी ‘ स्थापन करण्याचा निर्णय



प्रेस मीडिया लाईव्ह :

मुंबई :अल्पसंख्यांक मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांसाठी मौलाना आझाद संशोधन व प्रशिक्षण संस्था मार्टी च्या प्रस्तावाचा शासनाने फेरविचार करावा या मागणी करिता पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक 31 जुलै 2024 रोजी आक्रोश आंदोलन करण्यात आले होते ..यावेळी राज्य सरकारचा जाहीर निषेध करीत मागणी मान्य न केल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता ..

पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक राष्ट्रीय नेते फिरोज मुल्ला सर यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश आंदोलन करण्यात आले होते . . याची दखल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेऊन आज अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्याकरिता मौलाना आझाद संशोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला .राज्यातील अल्पसंख्याक बांधवांचे मागासलेपण दूर करुन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘बार्टी’, ‘सारथी’, ‘महाज्योती’, ‘अमृत’च्या धर्तीवर ‘अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजे ‘एमआरटीआय’ची स्थापना करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या संस्थेसाठी एकूण ११ पदे निर्माण करण्यात येतील. त्याचप्रमाणे या संस्थेच्या वेतन, कार्यालयीन खर्च, मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी, प्रशिक्षणासाठी एकूण ६ कोटी २५ लाख रुपयांच्या खर्चासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

राज्यात मुस्लिम, जैन, बौद्ध, ख्रिश्चन, ज्यु, सिख, पारशी हे अल्पसंख्याक नागरिक आहेत. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासाशी संबंधित समस्यांचा या संस्थेमार्फत अभ्यास करण्यात येईल.

Post a Comment

Previous Post Next Post