महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पुढील 10 दिवस मुसळधार पावसाची शक्यता -- हवामान खाते


#प्रेस मीडिया लाईव्ह :

भारतीय हवामान खात्यानुसार, महाराष्ट्रासह उत्तर भारतात पावसाचा जोर वाढू शकतो. आयएमडीने सांगितले की, एल निनो संपल्यानंतर ला लेनाचा प्रभाव जाणवू लागला आहे. त्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने सांगितले की, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये भारतात 422.8 मिमीने 106 टक्के अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुण्यासह या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबई, पालघर, ठाणे, नाशिक, काल्हापूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदियासह आजूबाजूच्या परिसरात पावसाच्या पार्श्वभूमीवर येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातही अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रासह संपूर्ण देशात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. जून आणि जुलैच्या तुलनेत या महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post