प्रेस मीडिया लाईव्ह
कोरोची येथील गावभाग कन्या विद्यामंदिर येथील खट्याळ मुख्याध्यापक यशवंत भोकरे यांना नागरिकांनी धुलाई करत कार्यालयातून बाहेर काढल्याने मुख्याध्यापकाची पाचावर धारण बसली . खट्याळ मुख्याध्यापक यशवंत भोकरे यांच्या वर्तणुकीमुळे शिक्षणक्षेत्र बदनाम झाले आहे नागरिकांनी चांगली धुलाई केल्याने मुख्याध्यापक भोकरे यांनी शाळेतून पलायन केले
याबाबत अधिक माहिती अशी की दोन दिवसांपूर्वी मुख्याध्यापक भोकरे यांच्या विरोधात शाळेतील मदतनीस यांनी ग्रामपंचायत सदस्य साहेबलाल शेख यांच्याकडे तक्रार दिली होती त्याची तात्काळ दखल घेत ग्रामपंचायत सदस्य साहेब लाल शेख यांनी मुख्याध्यापक भोकरे यांना चांगलेच धारेवर धरले होते याची तक्रार गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे देण्यासाठी आज कन्या विद्यामंदिर या ठिकाणी ग्रामपंचायत मधील सरपंच व सर्व सदस्य हजर असता मुख्याध्यापक भोकरे यांना सरपंच व सर्व सदस्यांनी केलेल्या वर्तुनुकी बद्दल चांगले धारेवर धरले
याविषयी सरपंच भोरे यांनी ग्रामपंचायत मध्ये सर्व सदस्यांच्या यांची तात्काळ बैठक घेऊन भोकरे यांना निलंबन करण्याची मागणीचा ठराव करत गटशिक्षण अधिकारी यांना बोलावून निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले