चौघांना दोन दिवसांची कोठडी.
प्रेस मीडिया लाईव्ह
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर -कोल्हापुरातील रंकाळा परिसरात असलेल्या एका क्रेडिट सोसायटीत घुसून जातिवाचक शिवीगाळ करुन मारहाण केल्या प्रकरणी या संस्थेचा संचालक शुभम देशमुख यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दिली.लक्ष्मीपुरी पोलिसांनी मनसेच्या राजू दिंडोर्ले ,प्रसाद पाटील,समर्थ कशाळकर आणि विकास कांबळे यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
अधिक माहिती अशी की ,रंकाळा परिसरात असलेल्या एका क्रेडिट सोसायटीत मनसेच्या कार्यकर्त्यांनी केबीन मध्ये जबरदस्तीने घुसून संस्थेचे चेअरमन सचिन साबळे व सुरेश पाटील यांना अश्लिल भाषेत जातिवाचक शिवीगाळ करुन कंबरेच्या पट्ट्याने आणि हाताला सापडेल त्या वस्तुने मारहाण केली.तसेच मार खात असलेली व्यक्ती ही महार जातीची असल्याची माहिती असून ही सर्वाच्या समक्ष "ह्या महार जातीच्या नादाला कशाला लागताय ,तुम्हालाही बुडविल अशी अवलाद आहे .तुम्ही जातीने पाटील आहात पाटला सारखे वागा असे म्हणत ह्या महार जातीचा माणूस कसा मोठा होतो ते मी बघतोच "असे अपमानास्पद जातीचा उल्लेख करून सर्वा समक्ष अपमान केला.तसेच संस्थेतील सीसीटिव्हीचा डिव्हीआर जबरदस्तीने घेऊन जात असताना फिर्यादी कडुन एका कागदावर जबरदस्तीने पैसे घेतल्याचा मजकूर लिहून घेऊन जाता जाता त्या संस्थेतील सर्व स्टाफला केंबिन मध्ये कोंडुन घातल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.