व्यावसायिकाची 18 लाखांची रोकड लंपास .

 संशयीताने कारवर दगडफेक करत पलायन केले

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- रस्त्याची कामे घेत असलेला व्यावसायिक ठेकेदार राहुल भोसले यांच्या कार मध्ये असलेली 18 लाखांची रोकड चोरट्यांनी लंपास केली.हा प्रकार  बुधवार दि.21 /08/2024 रोजी   भोसलेवाडी येथे साडे चारच्या सुमारास घडली.सदरचा प्रकार कारच्या चालकाच्या लक्षात येताच पैशाची बँग घेऊन जाणारयां चोरट्यांचा पाठलाग केला असता चोरट्याने कारवर दगडफेक करून तेथून पलायन केले.याची फिर्याद देण्याची प्रक्रिया रात्री उशिराप्रर्यंत शाहुपुरी पोलिस ठाण्यात सुरु होती.

अधिक माहिती अशी की,भोसलेवाडी येथील प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर राहूल भोसले यांनी यांच्याकडे नोकरीस असलेला सुपरवायझर प्रसाद गावडे ह्यानां शाहुपुरी येथे असलेल्या बँकेतुन 18 लाखांची रक्कम काढ़ुन आणण्यास पाठविले होते.गावडे हे आपल्या मालकांची कार घेऊन गेले होते.या कारवर महेश पाटील हे कार चालक म्हणून आले होते.ब्यकेतुन रक्कम काढ़ुन कार मधून भोसलेवाडी येथे असलेल्या चौकात राहूल भोसले यांच्या मुलीस घेण्यासाठी आले होते.त्या वेळी भोसले यांची मुलगी बस मधून खाली उतरली.त्या वेळी या कारचा चालक महेश पाटील यांनी  माजी शाळेच्या आवारात थांबवली होती.गावडे हे अगोदरच  खाली उतरून दुसरीकडे गेले होते.या वेळी महेश पाटील कारचा दरवाजा उघडून मुलीला घेऊन येण्यासाठी पुढ़े गेला असता.चोरट्याने ही संधी साधत कारचा दरवाजा उघडून 18 लाखांची असलेली  बँग घेऊन कं.बावडाच्या मार्गे पळुन जात असल्याचे महेश पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी त्या चोरट्याचा पाठलाग केला असता चोरट्याने कारवर दगडफेक केली असता कारवर दगड आपटल्याने कार चालकाने कार जागीच थांबवली असता चोरटा पसार झाला.याची माहिती महेश पाटील यांने सुपरवायझर आणि मालकांना फोन वरुन दिली .सुपरवायझर आणि मालक  दोघेही घटना स्थळी दाखल झाले.त्यांनी या घटनेची माहिती फोन करून शाहुपुरी पोलिसांना दिली असता पोलिस तात्काळ घटना स्थळी दाखल झाले.पोलिसांनी या परिसरात असलेल्या सीसीटिव्हीच्या आधारे माहिती घेण्याचा प्रयत्न केला पण  तेथे कुठेही सीसीटिव्ही नसल्याने चोरट्याचा माग लागला नाही.संशयीत चोरट्यावर रात्री उशिराप्रर्यत शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.

घटना स्थळी शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके ,शाहुपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांच्यासह पोलिस पथक दाखल झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post